kalyani tibhe 
उत्तर महाराष्ट्र

मराठी चित्रसृष्टीत हिरकणी ठरली नवापूरची कल्याणी 

विनोद सूर्यवंशी

नवापूर : वाचलं होतं .... उडणाऱ्या पंखांना क्षितिजे नसतात, त्यांना कवेत घेणारे आकाश हवे असते.. अशाच प्रकारे जिद्द, चिकाटी, मेहनतीचा जोरावर अभिनय क्षेत्रात कलागुणांना वाव देऊन नवापूर येथील सर्वसामान्य कुटुंबातील कल्याणी टिभे या युवतीने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे. तिचा हिरकणी हा चित्रपट नुकताच प्रसिद्ध झाला असून लवकरच दूरचित्रवाणीच्या एका वाहिनीवर तिची मालिकाही सुरू होऊ घातली आहे. 

नवापूर शहरातील नदीकाठी असलेल्या घरात राहणारे टिभे कुटुंब. त्या कुटुंबातील प्रवीण टिभे यांची कन्या कल्याणी टिभे. या युवतीने आपल्या अभिनयाच्या कौशल्यावर कमांड मिळवीत मराठी चित्रपट सृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. ध्येय गाठण्यासाठी जिद्द, चिकाटी,अविरत परिश्रम हे आवश्‍यक असते. ते असल्यास तुम्हाल यशाचा शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. असे म्हटले जाते. मात्र ते कल्याणी हिने प्रत्यक्षात सिद्ध करून दाखविले आहे कल्याणी हिने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. हिरकणी या चित्रपटात भूमिका साकारली आहे.२७ जानेवारीपासून स्टार प्रवाह वर सुरू होणाऱ्या जुळ्या भावांची लहान बहीण या मालिकेतून जनतेसमोर वेगळ्या भूमिकेत येत आहे. 

कल्याणी लहानपणापासून हुशार - शैला टिभे ( आजी) 
कल्याणी खूप हुशार आहे. कला गुण , वक्तृत्व हे वंश परंपरागत लाभले असून आधी मी लहान असताना भाषण लिहून देत असे पण आता ती सक्षम आहे. सर्वात महत्वाचे आमच्या संपूर्ण परिवाराने तिच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून सदैव तिला प्रोत्साहन दिले आहे , संकुचित मनाचे काळीज ठेवले नाही , माझी इच्छा आहे ती खूप मोठी अभिनेत्री व्हावी 

शैक्षणिक करिअर 
दिल्ली येथे सीबीआय मुख्यालयात एक वर्ष फॉरेनसिक एक्सपर्ट म्हणून काम केले.परंतु तिला (RAW) रो मध्ये रुची आहे. ती परीक्षेची तयारी करतेय.कॉलेज दरम्यान तिला नृत्य, वक्तृत्व ,नाटकची आवड असल्याने मित्र- मैत्रिणी सोबत भाग घेत असे. तिला प्रथम वर्षांपासून लहान मोठे रोल मराठी सिरीयल मध्ये भेटत गेले. अविरत परिश्रम व चांगल्या मैत्री स्वभावामुळे रंग मंच वर नाट्य स्पर्धा जिंकल्या. मराठी चित्रपट हिरकणीमध्ये लहानसा रोल मिळाला. पण तो बड्या अभिनेत्यासोबत.सध्या कल्याणी कोल्हापूर येथे मालिकांचे शूटिंग मध्ये व्यस्त आहे.नवापूर पालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा शैलाताई टिभे यांची नात व प्रवीण टिभे यांची कन्या तर राहुल टिभे, दीपक टिभे, किरण टिभे यांची पुतणी आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT