residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

चला स्वच्छता राखू या.... सात शाळांमध्ये "हॅण्ड वॉश' मोहीम 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक ः व्यक्तिला जे काही आजार होतात त्यात तोंडावाटे होणाऱ्या आजारांचे प्रमाण अधिक आहे. हात व तोंडाचा दिवसातून अनेकदा संबंध येत असल्याने हात स्वच्छ असेल तर आजारांपासून दूर राहणे शक्‍य होते. त्यापार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या शाळांमधून सध्या हॅण्ड वॉश अर्थात हात स्वच्छतेची मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी एका खासगी संस्थेच्या मदतीने सात शाळांमध्ये ही मोहीम राबविली जात आहे.

पुढील वर्षात आणखी तेरा शाळांमध्ये "हॅण्ड वॉश' मोहीम राबविली जाणार आहे. खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच दैनंदिन जगण्यातील नीतिमूल्ये शिकविली जातात. यात स्वच्छतेला अधिक महत्त्व दिले जाते. त्या तुलनेत महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना फक्त शिक्षण देण्यापुरताच उद्देश असतो.

स्वच्छतेसाठी पुढाकार

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या घरातील वातावरण पोषक नसते. त्यामुळे शिक्षण एके शिक्षण एवढ्यापुरतेच महापालिकेच्या शाळेचा रोल असतो. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असतानाच आता विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे देण्यातही पुढाकार घेतला जात आहे. स्वच्छतेचे धडे देताना हातांच्या स्वच्छतेला अधिक महत्त्व दिले जात आहे. त्या अनुशंगाने नियमित शिक्षणाबरोबर शाळा सुरू होण्याअगोदर, जेवणाची सुट्टी व अन्य फावल्या वेळेत हात धुण्याची सवय विद्यार्थ्यांना लावली जात आहे. 

स्वच्छतेचे महत्त्व बिंबविण्याचा प्रयत्न 
महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी हातांच्या स्वच्छतेबाबत अनभिज्ञ असतात. त्यामुळे हॅण्ड वॉश मोहीम राबविली जात आहे. उपक्रमाला जीएसके व सेव्ह दी चिल्ड्रन या संस्थेची मदत मिळत आहे. अंबड येथील शाळा क्रमांक 77 मध्ये संस्थेने तेरा लाख रुपये खर्च करून स्वच्छतागृहे तयार करताना विद्यार्थ्यांना हॅण्ड सोप तयार करण्याचे प्रशिक्षणदेखील दिले आहे. तयार केलेल्या सोपचा वापर घरी करणे विद्यार्थ्यांना बंधनकारक केले आहे. हात कसे धुवायचे, त्याबाबतच्या कृतीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. हात धुण्याबरोबर अस्वच्छतेचे तोटे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जात आहे. स्वच्छता कमी असेल तर लाल, चांगली असेल तर पिवळा व मध्यम स्वरूपाची स्वच्छता असेल, तर हिरवा रंगाच्या तक्‍त्यावर दररोज मोजमाप केले जाते यातून विद्यार्थ्यांवर दररोज स्वच्छतेचे महत्त्व बिंबवण्याचा प्रयत्न शाळेचा आहे. 

महापालिकेच्या सात शाळांमध्ये उपक्रम सुरू असून यावर्षी आणखी तेरा शाळा समाविष्ट केल्या जाणार आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व शाळांमध्ये उपक्रम राबविला जाईल. 
- देवीदास महाजन, शिक्षणाधिकारी, महापालिका. 

विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व बिंबविण्यासाठी नियमित शिक्षणाबरोबरच स्वच्छतेसारख्या नीतिमूल्यांचे शिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांचा उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
- विजय कवर, केंद्रप्रमुख. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT