residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

अबब....नाफेडच्या साडेबारा लाखांच्या  कांद्यावर चोरट्यांचा डल्ला 

सकाळ वृत्तसेवा

अंबासन : ट्रकची बनावट नंबर प्लेट आणि कागदपत्रे देत चोरट्यांनी चक्क नाफेडलाच गंडा घातला आहे. नाफेडने खरेदी केलेला सरकारी कांद्याच्या साडेबारा लाखांच्या 500 गोण्या कांद्याची परस्पर विल्हेवाट लावली. या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी चार परप्रांतीय संशयितांना अटक केली असून, अन्य दोन संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. 

आणि विश्वास संपादन केला

संशयित तसलीम शेर मोहम्मद (वय 21, रा. मेहुली, ता.जि. नुह, हरियाना) याने साथीदारांसह कांदा चोरीचा कट रचला. त्यामध्ये इमरान शेर मोहम्मद (33, रा. मेहुली, ता.जि. नुह) यांच्या मालकीचा ट्रक (आरजे 14, जीएच 9908)ची कागदपत्रे व नंबर प्लेट ट्रक (आरजे 14 जीके 8790)ला लावून कंपनीचा विश्‍वास संपादन केला.

कांदा भरून थेट दिल्लीला

या ट्रकमध्ये पाचशे गोण्या 24 हजार 325 किलो वजनाचा 12 लाख 50 हजार रुपयांचा नाफेडचा सरकारी कांदा भरून दिल्ली येथे रवाना करण्यात आला होता. इमरान शेर मोहम्मद याने वाहतुकीदरम्यान संतोषसिंग बन्शीसिंग यांच्याकडून बॅंक खात्यावर 15 हजार मागून घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

तपासाला गती मिळणार का...

तसलीम शेर मोहम्मद याने साथीदारांसह कांदा दिल्ली येथे पोच न करता ट्रक (आरजे 02, जीबी 6284)मध्ये 240 गोण्या भरून त्याच्या साथीदारांनी काशिम ऊर्फ चुन्ना इम्राखान (33, रा. धौजपाल मोहल्ला, गाव धौज फरिदाबाद) व केविंद्र देशराजसिंग (रा. पाली चौधरी चौपाट, ता. जि. फरिदाबाद) यांना विक्री केला. याबाबत शाखाधिकारी संतोषसिंग बन्शीसिंग यांच्या फिर्यादीवरून जायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक शिवरंजन पांढरे, उपनिरीक्षक जी. डी. पाटील तपास करीत आहेत.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT