mahavitaran office seal 
उत्तर महाराष्ट्र

करवसुलीसाठी ‘महावितरण’-‘महसूल’मध्ये राडा 

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : थकबाकीच्या पार्श्वभूमीवर वीज कंपनीने आज दुपारी महसूल विभागाचा वीजपुरवठा खंडित केला होता. महसूल विभागाचीही वीज कंपनीकडे थकबाकी असल्याने त्यांनी वीज उपकेंद्रांना ‘सील’ केले. मात्र, सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ‘महावितरण’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना विनंती केल्याने वीज कंपनीच्या कार्यालयाचे ‘सील’ काढण्यात आले. या घटनेने अडीच तास वीजपुरवठा खंडित होता. याचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. 


वीज कंपनीचे महसूल विभागाकडे आठ महिन्यांपासून ६५ हजार ४३० रुपये वीजबिल थकीत आहे, तर महसूल विभागाचे वीज कंपनीकडे एक लाख पंधरा हजार रुपये थकीत आहेत. यावरून आज दुपारी चांगलाच राडा झाला. वीज कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार, आज दुपारी तीनच्या सुमारास नवीन तहसील कार्यालयाची वीज खंडित केली. उपकार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, शहर अभियंता शरद वळवी व वायरमन यांचे पथक उपस्थित होते. दुसरीकडे तहसीलदारांच्या आदेशावरून महसूल विभागाचे नायब तहसीलदार जे. जे. पाडवी, शहर तलाठी निशिकांत पाटील, म्हसवे येथील तलाठी गौरव लांजेवार, पारोळा येथील मंडलाधिकारी शांताराम पाटील, महेंद्र सुतार यांनीही वीज कंपनीचे शहरासह तालुक्यातील वीज केंद्रांच्या कार्यालयास ‘सील’ लावले.

या राड्यात शहरात सुमारे अडीच तास वीज खंडित होती. सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागला. सायंकाळी वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तहसीलदार अनिल गवांदे यांच्याशी संपर्क साधून लवकरच थकबाकी भरण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर तहसीलदारांच्या आदेशाने हे ‘सील’ काढण्यात आले. या प्रकाराची दिवसभर शहरासह तालुक्यात चर्चा रंगली होती. 
 
वीज कंपनीची महसूल विभागाकडे थकबाकी आहे. सूचना देऊनही थकबाकी न भरल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार नवीन तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला होता. 
- प्रसाद पाटील, उपकार्यकारी अभियंता, वीज कंपनी, पारोळा 
 
जिल्हाधिकाऱ्यांचे वीजपुरवठा खंडित न करण्याचे निर्देश आहेत. मात्र, असे असतानाही स्थानिक अधिकाऱ्यांनी परस्पर कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केला, ही बाब अयोग्य आहे. 
- अनिल गवांदे, तहसीलदार, पारोळा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

7 अलिशान घरं, 16 कोटींची शेतजमीन अन् बरच काही, माणिकराव कोकाटेंची संपत्ती वाचून थक्क व्हाल!

Mumbai News: धारावीपासून दादरपर्यंत समस्यांची रांग! जनतेच्या अपेक्षा ‘मिनी सरकार’कडे; त्रिकोणीय लढतीने राजकीय तापमान वाढणार

IPL 2026 Auction: मुंबई, महाराष्ट्र अन् विदर्भाचे खेळाडूही मालामाल; राज्यातील 'या' १० खेळाडूंवर लागली बोली

CNG and PNG Rate: मोठी बातमी! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी होणार; पण किती रुपयांनी? जाणून घ्या...

Prithviraj Chavan refuses to apologize Video : ‘’माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, मी का माफी मागू?’’ ; ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत वादग्रस्त विधानावर पृथ्वीराज चव्हाण ठाम!

SCROLL FOR NEXT