police e learning
police e learning 
उत्तर महाराष्ट्र

"खाकी'नेही घेतला आता "ई-लर्निंग'चा ध्यास 

रईस शेख

जळगाव : बदलत्या काळात स्वत:तही बदल घडवत पोलिस यंत्रणा "स्मार्ट' झालीय.. पोलिसांना एकसमान कायद्याचे ज्ञान प्राप्त व्हावे, दैनंदिन कार्यपद्धतीचे अचूक प्रशिक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्र पोलिसदलातर्फे ई-अकादमी स्थापन करण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीच्या 240 चित्रफितींद्वारे हे प्रशिक्षण देत परीक्षाही घेतली जात आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑनलाइन प्रमाणपत्रही दिले जात असून, सेवा पुस्तकावर त्याची नोंद होणार आहे. 

पोलिस दलातही आता प्रत्येक कर्मचाऱ्याला "ई-लर्निंग' क्रमप्राप्त करण्यात आले आहे. दर महिन्यांनंतर तीन तासांचे ऑनलाइन प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आले असून, त्यामुळे गुन्ह्यांचा गुणवत्तापूर्ण तपास आणि दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. या योजनेंतर्गत प्रशिक्षण घेण्याचे आदेश पोलिसांना नुकतेच देण्यात आले आहेत. 

पोलिसांना प्रशिक्षण देण्यासाठी पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरवातीपासून सक्रिय असून, आवश्‍यकतेनुसार वेगवेगळ्या कार्यशाळा, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, कायदेपंडितांचे वर्गही पोलिसांसाठी भरविले जातात. नवनवे गुन्हे आणि त्यांची उकल करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतींबाबतचेही प्रशिक्षण वेळोवेळी दिले जाते. प्रत्येक आयुक्तालय आणि जिल्हा स्तरावर अशा प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले जात होते. आता हेच प्रशिक्षण व्हिडिओ-ऑडिओ क्‍लिपच्या स्वरूपात उपलब्ध असून, महाराष्ट्र पोलिस दलास ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण घेण्याची सोयही उपलब्ध झाली आहे. 

"ई-अकादमी'चा उपयोग 
पोलिस दलाने स्थापन केलेल्या ई-अकादमीच्या mpanashik.gov.in या वेबसाइटवर पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नोंदणी करून आपला पासवर्ड तयार करून नंतर प्रशिक्षण घ्यावे लागते. ऑनलाइन अर्ज मंजूर झाल्यानंतरच पुढील प्रशिक्षणाला सुरवात करता येते. प्रशिक्षणादरम्यान निर्धारित व्हिडिओ क्‍लिपद्वारे प्रशिक्षणासोबतच "ई-अकादमी'च्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षा होते. त्यात उत्तीर्ण होणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देत त्याची नोंद सेवापुस्तिकेत केली जाते. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दर महिन्याला तीन तासांचे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. 

राज्यभर प्रशिक्षणाचा "फीवर' 
सध्या राज्यातील 15 हजार 892 कर्मचाऱ्यांनी हे ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली आहे. या वेबसाइटवर एकूण 240 व्हिडिओ आणि तज्ज्ञांची व्याख्याने अपलोड आहेत. पोलिस दलातील जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी हे ई- लर्निंग घ्यावे, असे आदेश नाशिक परिक्षेत्रातील सर्वच पोलिस अधीक्षकांतर्फे जारी करण्यात आले आहेत. जिल्हा पोलिसदलातील साडेतीन हजार कर्मचाऱ्यांसह सर्व अधिकारी या प्रशिक्षण घेताना दिसून येत आहे. 

चालता-बोलता परीक्षा 
अँड्राईड मोबाईलद्वारे mpanashik.gov.in लॉगइन झाल्यावर न थांबता एकेक व्हिडिओ बघावा लागतो. त्यात विचारलेले प्रश्‍नाचे तेथेच उत्तरेही लिहावी लागतात, त्यात खासकरून फिर्याद कशी घ्यावी, जबाब कसे नोंदवावे, घटनास्थळ पंचनामा, गंभीर गुन्ह्याचा तपास कसा करावा, पुरावे संकलन, दोषारोप पत्र लिखाण, मृत्युपूर्व जबाब, समन्स-वॉरंट, व्हीआयपी बंदोबस्त, मुद्देमाल हाताळणी, पोलिस मॅन्युअल, सायबर गुन्ह्यांचा तपास, अटक गुन्हेगारांच्या अधिकारांचे पालन अशा विविध प्रशिक्षणांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT