residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

राज्यातील काही भागामध्ये आज  हलक्‍या ते मध्यम पावसाचा अंदाज 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक ः नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, जालना जिल्ह्यातील काही भागांमध्ये उद्या (ता. 27) जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या हवामान संशोधन विभागाने हा अंदाज वर्तवला आहे. तसेच नव्या वर्षामध्ये 5 ते 13 जानेवारीला निफाड (जि. नाशिक), महाबळेश्‍वर, नगरमध्ये पाच अंश सेल्सिअसपेक्षा कमी पारा घसरण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. 

विभागाच्या अंदाजानुसार पावसाची शक्‍यता असलेला परिसर असा ः नाशिक-सटाणा, चांदवड, कळवण, येवला, निफाड, लासलगांव, सिन्नर, दिंडोरी. पुणे-बारामती, इंदापूर, बोरी, नारायणगांव, कळंब. सांगली-जत, खानापूर, कवठेमहंकाळ, आटपाडी, तासगाव पूर्व, वाळवा, पलुस. सातारा-फलटण, खटाव. सोलापूर- अक्कलकोट, दक्षिण आणि उत्तर सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा. तसेच जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, जालना जिल्हा. केरळकडून आलेल्या वादळाचा हा परिणाम आहे. 

जरूर वाचा-धक्कादायक-परस्पर वारसाची  खोटी नावे लावली

नव्या वर्षात पावसाची शक्‍यता 
नव्या वर्षामध्ये 16 जानेवारीच्या दरम्यान, तीन ते चार दिवस ढगाळ हवामान राहून पावसाची शक्‍यता दिसते आहे. त्यावेळच्या वादळाच्या स्थितीवर पावसाचे आगमन अवलंबून असेल. तोपर्यंत पारा घसरण्याची स्थिती पूर्ण होईल आणि पावसाने हजेरी लावल्यानंतर मात्र हवामान चांगले होण्याचा याच विभागाचा अंदाज आहे. अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांची झोप उडवलेली असताना कांदा आणि गव्हाचे पीक धोक्‍यात आले आहे. 

वादळांची संख्या वाढली दुप्पटीने 
समुद्रामध्ये वर्षाला सर्वसाधारणपणे 12 ते 15 वादळ तयार व्हायचे. मात्र हवामानातील बदलामुळे गेल्या चार वर्षांमध्ये वादळांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने शेतीच्या नुकसानीत भर पडू लागली आहे. अलिकडच्या काळात वर्षाला समुद्रामध्ये तयार होणाऱ्या वादळांची संख्या 35 ते 40 पर्यंत पोचल्याची माहिती द्राक्ष बागायतदार संघाच्या हवामान संशोधन विभागातर्फे आज देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT