residenational photo
residenational photo 
उत्तर महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंची नाराजी दूर करा,राणेंना मंत्रीपद द्या :आठवले 

सकाळवृत्तसेवा

नाशिकः आगामी लोकसभा आणि विधानसभा स्वतंत्र लढवण्याने शिवसेना-भाजप असे दोघांचेही नुकसान होईल. म्हणूनच दोन्ही पक्षांनी रिपब्लिकन पक्षासमवेत निवडणुका लढवायला हव्यात असा आपला आग्रह आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची नाराजी भाजपने दूर करायला हवी, असे सांगत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे भाजपने दिलेली राज्यसभेची "ऑफर' नारायण राणे यांनी स्विकारावी अन्‌ त्यांना केंद्रात मंत्रीपद द्यावे, अशीही भूमिका मांडली. 

युतीने एकत्र निवडणूक लढवली आणि नाही लढवल्यास रिपब्लिकन पक्षाला नेमक्‍या किती जागा मिळाव्याते याचेही सूत्र श्री. आठवले यांनी जाहीर केले. लोकसभेसाठी युती झाल्यास दोन, न झाल्यास पाच, तर विधानसभेसाठी युती झाल्यास 15 आणि न झाल्यास 35 जागा भाजपने रिपब्लिकन पक्षाला द्याव्यात अशी आपली मागणी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले . काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या अभिवादन सभेसाठी श्री. आठवले नाशिकमध्ये आले होते. सभेपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, की भीमा-कोरेगावमधील घटनेच्या अनुषंगाने संभाजी भिडे व मिलींद एकबोटे यांची चौकशी सुरु आहे. चौकशीत त्यांचा सहभाग असल्याचे सिद्ध झाल्यावर त्यांच्यावर कारवाई होईल. पोलिसांनी आता तपासाला वेग द्यायला हवा. खरे म्हणजे, बहुजनांनी गुण्यागोविंदाने राहावे यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. दलित आणि मराठा समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्यास त्यास कोणीही बळी पडू नये. 


प्रकाश आंबेडकरांशिवाय ऐक्‍य अशक्‍य 
शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादीमध्ये असलेल्या आंबेडकरी चळवळीतील सर्वांनी एकत्र यावे. पण प्रकाश आंबेडकर यांनी नेतृत्व स्विकारायला हवे. श्री. आंबेडकर यांच्याशिवाय यापूर्वी आम्ही एकत्र आलो होतो. त्यावेळी आमची मतेही आम्हाला मिळालेली नाहीत, असे सांगत श्री. आठवले यांनी पुन्हा एकदा ऐक्‍याच्या शिडात हवा भरण्याचा प्रयत्न केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT