crime  
उत्तर महाराष्ट्र

पोलिसांचा फिल्मी स्टाइल पाठलाग..अन् चोरांच्या मुसक्या आवळल्या

Sakri crime news: मध्यरात्रीनंतर साक्री शहरातील मुकुंदनगर, रमेशनगर आदी परिसरात संशयास्पद फिरणारे व्यक्ती दिसत असल्याची खबर पोलिसांना मिळाली.

सकाळ डिजिटल टीम



साक्री : गेल्या महिन्यातील सलग चोरीच्या (Theft) घटनांमुळे शहरातील नागरिकांसह पोलिस प्रशासनासमोर (Police) चोरट्यांनी मोठे आव्हान उभे केले होते. लवकरात लवकर चोरीच्या घटनांना आळा बसावा, अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून होत होती. त्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. ५) पहाटेच्या सुमारास फिल्मी स्टाइल पाठलाग करीत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची कामगिरी साक्री पोलिसांनी (Sakri police Action) केल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

चोऱ्यांना आळा बसावा, यासाठी पोलिस निरीक्षक दिनेश आहेर आपल्या सहकाऱ्यांसह शहरातील विविध कॉलनी परिसरात नागरिकांच्या बैठका घेत, हस्तपत्रिका वाटप करीत रहिवाशांनी घ्यावयाची काळजी, तसेच प्रसंगी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करीत होते. पोलिसांकडून होणाऱ्या या प्रयोगाला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसादास सुरवात होताच गुरुवारी मध्यरात्रीनंतर शहरातील मुकुंदनगर, रमेशनगर आदी परिसरात संशयास्पद फिरणारे व्यक्ती दिसत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलिस उपनिरीक्षक रोशन निकम, भानुदास नर्हे, पोलिस हवालदार विजयसिंग पाटील, चेतन गोसावी, ए. एन. पाटील, सुनील अहिरे आदींसह अंबापूर रोड, नागरेनगर, मुकुंदनगर, रमेशनगर, चिराईमाता कॉलनी, साईरामनगर आदी ठिकाणी गस्त घातली. यावेळी महामार्गालगत सानेगुरुजी नगरशेजारी एक ऑटो रिक्षा संशयास्पदरीत्या उभी असलेली श्री. आहेर यांना आढळली.

त्यावर एका सहकाऱ्याला लक्ष ठेवण्यास सांगून ते पुढील कार्यवाहीसाठी निघाले असता, त्या रिक्षात तीन व्यक्ती बसल्याचे आहेर यांना संबंधित कर्मचाऱ्याने कळविले. यावर पाठलाग सुरू केल्याने रिक्षातील आरोपींनी पळ काढला. ते हाती लागत नसल्याचे लक्षात आल्याबरोबर खासगी वाहनात नागरिकांसमवेत असलेले पोलिस निरीक्षक श्री. आहेर यांनी संबंधित वाहनाचा पाठलाग सुरू केला. साक्री शहरापासून सुरू झालेली ही पळापळ अखेर पाच किलोमीटर अंतरावरील गंगापूर गावाजवळ थांबली. यावेळी एक चोरटा पोलिसांच्या हाती लागला. तर दुसरे दोन अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र पोलिसांनी आपल्या कामाचा वेग वाढवित पुन्हा एकाला ताब्यात घेतले. लक्ष्मण आटोळे आणि विजय शिकलकर (रा. मोहाडी) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडे ऑटो रिक्षा (एमएच १८, बीएच ०६३९) सह चाकू, कटर, हातोडा, विविध प्रकारचे पान्हे, स्क्रू ड्रायव्हर आदी साहित्य मिळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर अन्य एका वाहनात अजून काही साथीदार असल्याची माहितीही पोलिसांना संबंधितांनी दिली आहे. दोघांना पोलिस ठाण्यात आणले असता शुक्रवारी (ता. ६) धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील इतर चोरीच्या घटनांचा शोध घेण्यासाठी त्यांना ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई होत आहे. या घटनेमुळे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

चोरीच्या घटनेतील आरोपींचा शोध घेणे ही आमची जबाबदारी असून, भयमुक्त वातावरणासाठी नागरिकांनीही सतर्कता दाखवित पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. या घटनेत आरोपींना पकडण्यात नागरिकांची झालेली मदत कौतुकास्पद असून, जनतेचे असेच सहकार्य मिळाल्यास पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांना काम करण्याची ऊर्जा प्राप्त होते.
-दिनेश आहेर, पोलिस निरीक्षक, साक्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT