residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

सेव्ह द चिल्ड्रन....उपक्रमासाठी 40 शाळांची निवड 

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी : गुणवत्ता विकासासाठी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग शिक्षकांचे मनोबल वाढविणारा ठरत असून, गोरगरिबांच्या मुलांचे भविष्य "सेव्ह द चिल्ड्रन' या उपक्रमातून उजळू शकते. हा नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व समाजाने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांनी केले 

शिक्षण विभाग पंचायत समिती, इगतपुरी व सेव्ह द चिल्ड्रन या स्वयंसेवी संस्थेतर्फे नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी इगतपुरी तालुक्‍यातील विविध भागातील 40 शाळांची निवड करण्यात आली असून, या उपक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. झनकर-वीर बोलत होत्या. 

पदाधिकारीचे पुढे

गटविकास अधिकारी किरण जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी भारत वेंदे, गटशिक्षणाधिकारी प्रतिभा बरडे, शिवनाथ निर्मळ, जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्ताराधिकारी नीलेश पाटोळे, सुनील दराडे, सेव्ह द चिल्ड्रन संस्थेच्या राज्य समन्वयक इप्सिता दास, प्रकल्प समन्वयक हरीश वैद्य, लिबना शहा, केंद्रप्रमुख पोपट महाजन, अकबर शेख, पंडित धोंगडे, गोरखनाथ परदेशी, पोपट देवरे, विजय पगारे, राजेंद्र नांदूरकर आदी उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी प्रतिभा बरडे यांनी प्रास्ताविकात तालुक्‍यातील विविध भौतिक सुधारणा, शैक्षणिक गुणवत्ता, तसेच राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 
गटविकास अधिकारी जाधव, सेव्ह द चिल्ड्रन संस्थेच्या समन्वयक इप्सिता दास, लिबना शहा, हरीश वैद्य, शिवनाथ निर्मळ, विजय पगारे, राजेंद्र नांदूरकर, जगदीश खैरनार, अकबर शेख आदींनी मनोगत व्यक्त केले. हरीश वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. कविता सानप यांनी आभार मानले. 

या शाळांची झाली निवड : 
बोरटेंभे, गिरणारे, त्रिंगलवाडी, बलायदुरी, घोटी मुले-मुली, नांदगाव सदो मुले-मुली, टाके घोटी, काळुस्ते, तळोघ, रामरावनगर, माणिकखांब, देवळे, खैरगाव, अधरवड, बारशिंगवे, भंडारदरावाडी, साकूर, मुकणे, कुशेगाव, मोडाळे, सांजेगाव, कावनई, बेलगाव तऱ्हाळे, भरवीर खुर्द, तळेगाव, आडवण, शेवगेडांग, टिटोली, सोमज, वाळविहीर, दौंडत, उभाडे, उंबरकोन, इंदोरे, भरवीर बुद्रुक, मोगरे व मानवेढे. 

:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT