child birth 
उत्तर महाराष्ट्र

लॉकडाउनचा काळ ठरला मातृत्‍वाचा...या तालुक्‍यात दोन हजाराहून अधिक बालकांचा जन्‍म

कमलेश पटेल

शहादा : कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका सर्वच घटकांना बसला असताना मातृत्वाची ओढ असणाऱ्या महिलांसाठी मात्र लॉकडाउन सुखद धक्का देऊन गेला आहे. लॉकडाउनचा काळात शहादा तालुक्यातून तब्बल दोन हजार ३२६ गरोदर महिलांची नोंदणी आरोग्य विभागाकडे झाली होती. याच काळात ८३० महिलांची प्रसूतीदेखील सरकारी रुग्णालयात झाल्या. इतर प्रसूती मात्र खासगी रुग्णालयात झाल्या. 
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने २२ मार्चपासून लॉकडाउन सुरू झाले. मागील तीन महिन्यांत सर्व व्यवहार ठप्प होते. अत्यावश्यक सेवा वगळता आस्थापना बंद राहिल्याने कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. लॉकडाउनचे नफे, तोटे समोर आले असताना, अनेक दिवसांपासून कुटुंबापासून, गावापासून दूर गेलेली माणसे एकत्र आली. नात्यातील जिव्हाळा वाढला. खर्च कमी झाला. घरातील कौटुंबिक नाते घट्ट झाल्याचे समोर आले आहे. याच लॉकडाउनच्या काळात आरोग्य विभागाकडून सातत्याने ग्रामीण भागात गरोदर महिलांच्या नोंदी घेण्याचे काम सुरू होते. कोरोनाचा धोका सर्वाधिक गरोदर मातांना होता. एप्रिल ते जून महिन्यांत महिला गरोदर राहण्याचे प्रमाण दिसून आले. या तीन महिन्यांत शहादा तालुक्यातून तीन हजार ३२६ महिला गरोदर असल्याची नोंद झाली होती. गरोदर महिलांसोबत प्रसूती झालेल्या महिलांची संख्यादेखील बऱ्यापैकी आहे. तीन महिन्यांत ८३० महिलांची प्रसूती झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. इतर महिलांनी मात्र खासगी रुग्णालयात प्रसूती केली आहे. गरोदर महिला आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभागाने लसीकरणात खंड पडू दिला नाही. आरोग्य विभागातील डॉक्टर परिचारिकांनी चोख सेवा बजावली. 

दृष्टिक्षेपात शहादा तालुका 
गरोदर माता नोंदणी प्रसूती संख्या 
एप्रिल- ८०३ - २५६ 
मे- ७७७ - २७६ 
जून- ७४६ - २९८ 
एकूण २,३२६ - ८३० 
 
लॉकडाउनच्या काळात गरोदर महिला व लहान मुलांची विशेष काळजी घेण्यात आली. आवश्यक त्या लसी देण्यात आल्या. यासाठी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. 
-डॉ. राजेंद्र पेंढारकर, तालुका आरोग्याधिकारी, शहादा 

संपादन : राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT