bibtya imege
bibtya imege 
उत्तर महाराष्ट्र

त्याने केला त्याचा पाठलाग...अन काय पडला ना विहिरीत 

सकाळ वृत्तसेवा

त्याने केला त्याचा पाठलाग...अन काय पडला ना विहिरीत 

शहादा : वर्डे त. श.(ता. शहादा) शिवारात आज पहाटे भक्ष्याचा पाठलाग करत असताना भक्ष्य व बिबट्या दोन्ही गावानजीक असलेल्या कोरड्या विहिरीत पडले. ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर वन विभागाचे वनक्षेत्रपाल अनिल पवार कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. अनेक तासाच्या कसोशीने प्रयत्न करत कोरड्या विहिरीतून बिबट्याला बाहेर काढण्यात यश वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाले. 

वर्डे टेंभे शिवारात आज पहाटे कुत्र्याच्या पाठलाग करतांना बिबट्या व कुत्रा दोन्ही गावा जवळ असलेल्या कोरड्या विहिरीत पडल्याची घटना ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाला कळविले वनविभागाचे वनक्षेत्रपाल अनिल पवार आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. दुपारपर्यंत कसोशीने प्रयत्न करत बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान आठवड्यापूर्वी ग्रामस्थांना तीन बिबटेनिदर्शनास आले होते. त्यांनी वन विभागाला कळविले होते परंतु वनविभागाने दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थ म्हणतात. त्यातील एक बिबट्याला आज पकडण्यात वनविभागाला यश आले. उर्वरित दोन बिबटे अद्यापही आढळून आलेले नाहीत. सुदैवाने बिबट्या नरभक्षक नसल्याने मानवी वस्तीला धोका पोहोचला नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता अजूनही दोन बिबट्यांचा माग घ्यावा अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी करीत आहेत. 

विहिरीत दोघांचा थरार.... 
दरम्यान, कुत्रा व बिबट्या दोघांचाही विहिरीत थरार सुरू होता. ग्रामस्थांनी हा थरार याची देही याच डोळी अनुभवला. शेवटी थरार संपवत दोघेही दोन कोपऱ्यात बसले. शेवटी वन विभागाने बिबट्याला जेरबंद करीत बाहेर काढले. नंतर कुत्र्यालाही ग्रामस्थांचा मदतीने बाहेर काढले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT