stone statue found 
उत्तर महाराष्ट्र

पाया खोदताना आढळली पाषाणमुर्ती...मुर्ती कसली सुरू झाले तर्कवितर्क 

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : थाळनेर (ता.शिरपूर) येथे घराचा पाया खोदताना भग्नावस्थेतील पाषाणमूर्ती आढळली. ही मूर्ती ऐतिहासिक असून जैन तीर्थंकराची असल्याचा अंदाज आहे. मूर्तीचा खांदा, मान व शिर परिसरातच पुरले असावे, असा अंदाज आहे. 

थाळनेर गावातील बाजारपेठेत भूषण देवराम चौधरी यांच्या नव्या घराचा पाया खोदण्याचे काम सुरू आहे. आज सकाळी साडेदहाला खोदकाम सुरू असताना कामगारांना मोठा दगड लागला. त्यांनी सावधपणे दगडाच्या आजूबाजूची माती कोरली. मोठी मूर्ती आढळल्याने त्यांनी काळजीपूर्वक खोदकाम करीत ती बाहेर काढली. मूर्तीच्या धडावरील खांदा, मान आणि शिर असे अवयव खंडित झाल्याचे दिसून आले. मूर्तीशेजारच्या भागात मजुरांनी अन्य अवयवांचाही शोध घेतला. मात्र कोणतेही अवशेष आढळले नाहीत. ग्रामस्थांनी मूर्ती स्वच्छ धुवून पूजा केली. 
काळ्या पाषाणात घडवलेली ही मूर्ती अडीच ते तीन फूट उंचीची आहे. पद्मासनात ध्यानस्थ बसलेली मूर्ती असून, त्याखाली संस्कृत लिपीत मजकूर कोरला आहे. मूर्तीच्या ठेवणीवरून ती जैन धर्माचे वर्धमान महावीर वा अन्य तीर्थंकरांची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. थाळनेर गाव ऐतिहासिक काळात खानदेशची राजधानी होते. तेथे अहिर (गवळी) राजांचा भुईकोट किल्ला, फारुकी राजवटीतील हाजिरे अशी स्थळे अद्यापही शाबूत आहेत. मुघलांच्या आक्रमणप्रसंगी मूर्तिभंजन होण्यापासून वाचविण्यासाठी मूर्ती जमिनीत पुरण्यात आली असल्याची शक्‍यता आहे. यापूर्वीही भुईकोट किल्ल्यात श्री विष्णू, भगवान महावीर यांच्या मूर्ती आढळल्या आहेत. गतवर्षी बाजारपेठेतील खोदकामाप्रसंगी सोन्याची नाणी भरलेला हंडा आढळून आला होता. या मूर्तीची इतिहास संशोधकांनी पाहणी करून सविस्तर माहिती प्रसिद्ध करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त करण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT