marriage 
उत्तर महाराष्ट्र

दोन दिवसांवर विवाह अन्‌ तिच्याबाबतीत घडले अघटीतच 

सकाळ वृत्तसेवा

सोनगीर : शेतातील वीजपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा तोल जाऊन विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी सव्वापाचला बुरझड (ता. धुळे) येथे उघडकीस आली. पूनम बापू पाटील (वय 20) असे मृत तरुणीचे नाव आहे. दरम्यान, पूनमचा बुधवारी (ता. 29) "कोरोना'मुळे कळमसरे (ता. पाचोरा) येथे साध्या पद्धतीने विवाह होणार होता. तिचे विवाहवेदीवर चढण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. 

क्‍लिक करा - कोरोनाचे सावट तरी त्यांची लपाछपी सुरूच...प्रशासनाची डोकेदुखी वाढली 

पूनमसह तिची आई संगीताबाई व वडील बापू मन्साराम पाटील आज सकाळी शेतात गेले होते. विहीर शेतापासून 1500 फूट लांब आहे. दुपारी दोनच्या सुमारास पूनम विहिरीवरील वीजपंप सुरू करण्यासाठी गेली होती. पाऊण तास झाला तरी ती परत न आल्याने वडील व आई तिचा शोध घेण्यासाठी विहिरीकडे गेले असता त्यांना पूनमचे प्रेत विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळले. यामुळे त्यांनी एकच आकांत सुरू केला. ती तोल जाऊन विहिरीत पडल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांच्या मदतीने पूनमला विहिरीबाहेर काढून येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे ती मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. यादव मन्साराम पाटील यांनी येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. 

दोन दिवसांनी होता विवाह 
मृत पूनम "बीएस्सी'च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होती. तिचा कळमसरे (ता. पाचोरा) येथे येत्या 29 एप्रिलला विवाह निश्‍चित झाला होता. "कोरोना'मुळे मोजक्‍या नातेवाइकांच्या उपस्थितीत कळमसरे येथील मंदिरावरच हा सोहळा होणार होता. मात्र, पूनमचे विवाहाचे स्वप्न तिच्या अकाली मृत्यूमुळे अपूर्णच राहिले. पूनमच्या मागे आई, वडील, पुणे येथील कंपनीत नोकरीला असलेला भाऊ समाधान, व शेती करणारा भाऊ धनंजय असा परिवार आहे. घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT