Dr. Bharti Pawar
Dr. Bharti Pawar  Dr. Bharti Pawar
उत्तर महाराष्ट्र

तर..मंत्र्यांना तुम्ही जाब विचारला पाहिजे-राज्यमंत्री डाॅ. पवार

सम्राट महाजन

भाजपची जनआशीर्वाद यात्रेदरम्यान तळोदयातील आदिवासी सांस्कृतिक भवनात महिला मेळावा संपन्न झाला.


तळोदा : आदिवासी बांधवांचे शिक्षण, आरोग्याचे प्रश्न सुटलेले नाहीत ते सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार. आदिवासी विकास मंत्री (Minister for Tribal Development) जिल्ह्यातील असून देखील लाभार्थ्यांना खावटीची मदत मिळायला उशीर झाला, त्यामुळे याबाबत तुम्ही मंत्रींना जाब विचारला पाहिजे. तुमची भारती तुमचा आशीर्वाद घ्यायला आली आहे, तुमची माया-तुमची छाया माझ्यावर राहू द्या अशी साद घालत 'बठ्ठा काळजी लेजा' असे आपुलकीचे बोल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Minister State Health Dr. Bharti Pawar) यांनी काढले.



भाजपची जनआशीर्वाद यात्रेदरम्यान तळोदयातील आदिवासी सांस्कृतिक भवनात महिला मेळावा संपन्न झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रदेश संयोजक किशोर काळकर, प्रदेशाध्यक्ष अशोक उईके, जिल्हाप्रभारी बबनराव चौधरी, लक्ष्मणराव सावजी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, खासदार डॉ. हिना गावीत, आमदार राजेश पाडवी, प्रदेशसदस्य राजेंद्रकुमार गावीत, प्रकाश गेडाम, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, सरचिटणीस राजेंद्र गावीत, प्रदेश चिटणीस श्याम राजपूत, यशवंत ठाकरे, नगरसेविका अंबिका शेंडे, नगरसेवक हेमलाल मगरे, युवा जिल्हा उपाध्यक्ष शिरीष माळी, पंचायत समितीचे सदस्य विजयसिंह राणा, दाज्या पावरा, युवा जिल्हा उपाध्यक्ष दीपक चौधरी, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे, शानु वळवी, किन्नरी सोनार, सुनिल चव्हाण, बळीराम पाडवी, नारायण ठाकरे, राजू गाडे, निलाबेन मेहता, रशिलाबेन देसाई, गोपी पावरा, दारासिंग वसावे, पंकज तांबोळी, घनश्याम कलाल आदी उपस्थित होते.

Dr. Bharti Pawar



राज्यमंत्री पवार पुढे म्हणाल्या की, मोदी सरकारने महिलांसाठी उज्ज्वला गॅस, सुकन्या समृद्धी योजना आणून दिलासा दिला आहे. समस्या सोडवण्यासाठी मी तुमचं पालकत्व घेत असून त्यासाठी नेहमीच इथे येत राहील असे सांगितले. आमदार राजेश पाडवी म्हणाले की, मोदी शासनाने संपूर्ण आदिवासी महिलांचा सन्मान केला आहे. मंत्री भारती पवार सर्व समाज बांधवांना चांगली आरोग्याची सेवा मिळेल या दृष्टीने प्रयत्न करतील असे सांगितले. जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी सांगितले की, मंत्री भारती पवार यांचे पायगुण चांगले आहेत त्यामुळेच त्यांनी खानदेशात पाय ठेवताच गेल्या महिन्याभरापासून दडी मारलेला पाऊस सर्वत्र पडतो आहे. तसेच भाजपाने गोरगरिबांसाठी अनेक योजना आणल्या आहेत असे सांगितले. यावेळी खासदार डॉ. हिना गावीत, अशोक उईके, शानुताई वळवी यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

Dr. Bharti Pawar


लोकनृत्यावर ठेका -
राज्यमंत्री भारती पवार यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच आदिवासी बांधवांनी त्यांच्या स्वागतासाठी पारंपरिक वाद्य वाजवीत लोकनृत्य सादर केले. यावेळी राज्यमंत्री पवार यांनी देखील त्यांच्यासोबत पारंपरिक नृत्यावर ठेका धरला. यावेळी खासदार हिना गावीत, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांनी त्यांना साथ दिली.

ठिकठिकाणी स्वागत
राज्यमंत्री भारती पवार यांचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळ स्वागत केले. त्यानंतर माळी समाजपंच मंडळ, नगरसेवकांनी, दत्त मंदिर, स्वामी समर्थ सेवा केंद्र, राम मंदिर, जोहरी समाज, चौधरी समाज, सोनार समाज तसेच मेन रोडवर ठिकठिकाणी व शेवटी नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या निवासस्थानी त्यांचे स्वागत करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : सायना नेहवाल, राजकुमार राव यांचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT