residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

हूश्य...सुटले एकदाचे....नाराज गुरूजींना त्यांच्याच प्रभागात काम

आनंद बोरा

नाशिक ः मतदार पडताळणी मोहिमेवरुन निवडणूक विभाग आणि मतदान केद्रस्तर आधिकारी (बिएलओ) शिक्षकांमधील धुम्मस शमविण्यासाठी गुरुवारी (ता.26) झालेल्या बैठकीत, एकाच शाळेतील अधिक शिक्षक घ्यायचे नाही. शिक्षक राहात असलेल्या प्रभागातच त्यांच्या नेमणूका करायच्या यासह विविध मागण्यांबाबत निवडणूक विभागाने सकारात्मक प्रतिसाद देत, नाराज गुरुजीना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 

नगरच्या धर्तीवर नाशिकमध्ये आठवड्यापासून बिएलओचे कामकाज करण्यावरुन नाराज असलेल्या प्राथमिक शिक्षकांचा निवडणूक कामाला विरोध सुरु आहे. त्यापार्श्‍वभूमीवर काल उपजिल्हा निवडणूक अधिकारी कुंदन सोनवणे यांनी शहरातील चारही विधानसभा मतदारसंघात निवडणूक कामकाज करणाऱ्या (बीएलओ) शिक्षकांच्या अडचणीबाबत 
शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यात, शिक्षकांनी बीएलओ म्हणून काम करताना येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला. तर निवडणूक विभागाने त्यांच्या अपेक्षेनुसार अनेक विषयात लवचिक निर्णयावर सकारात्मक प्रतिसाद दिला. 

10वर्षापासून निवडणूक काम 
जिल्ह्यात काही शिक्षक तब्बल 10 वर्षापासून "बीएलओ' म्हणून कार्यरत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. बीएलओंचे काम करणाऱ्या महिला शिक्षिकांना त्या रहात असलेला परिसर सोडून इतरत्र नियुक्ती देण्यात आली आहे. ठराविक काही शाळेतील शिक्षकांना जास्त काम दिले जाते. हे सगळे अडवणूकीचे प्रकार पदाधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिले.

कामकाजाचा आढावा
आयोगाकडून मतदार पडताळणी सूरू असल्याने तूर्तास एकाही बीएलओला कामातून वगळणे शक्‍य नाही. परंतु, पण मोहिम झाल्यानंतर वर्षानुवर्षे हेच काम करणाऱ्यांबाबत आढावा घेतला जाईल. एकाच शाळेतून जास्तीचे शिक्षक घेतले जाणार नाही, असे श्री सोनवणे यांनी आश्‍वासन दिल्यानंतर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मतदार पडताळणी काम सुरु करण्याची तयारी दर्शवली. 

शहरात 1200 शिक्षक 
नाशिक शहरात पुर्व, पश्‍चिम, मध्यसह देवळाली मतदारसंघाचा 30 ते 40 टक्के भाग आहे. हे सर्व मतदारसंघ मिळून जवळपास 1200 बीएलओ कार्यरत आहेत. या सर्व बीएलओंना आयोगाकडुन सुरू असलेली मतदार पडताळणी मोहिम 13 फेब्रुवारीपर्यंत पुर्ण करावी लागणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT