उत्तर महाराष्ट्र

यावला बॅटरीचा स्फोटात; चार मजूर गंभीर जखमी 

सकाळ वृत्तसेवा

यावल  : येथील एका भंगार दुकानातील इलेक्ट्रॉनिक तोल काट्याच्या विद्युत बॅटरीचा अचानक स्फोट होवुन त्यात चार मजुर गंभीर जखमी झाल्याची घटना आज (ता. २६) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. यातील सर्व जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. 

नक्की वाचा :  अरे वा...142 शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम प्राप्त 

शहरातील आठवडे बाजार परिसरातील एका भंगारच्या मोठ्या दुकानातील भंगार मोजण्याच्या इलक्ट्रॉनिक वजनी तोल काट्यामधील असलेल्या बॅटरीचा आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक स्फोट झाला. त्या ठिकाणी भंगारचे ट्रक भरण्यासाठी काम करीत असलेले मजुर नाजीमोदीन शेख सलीम (वय २७), राजू बराती खाटीक (वय ३८), नासीर खान हाफीज खान (वय २४) आणि मोहसीन अकबर खाटीक (वय २३) सर्व राहणार यावल हे जखमी झाले. त्या इलेक्ट्रॉनिक वजनी तोलकाट्याचा अचानक स्फोट झाल्याने, तोलकाट्यावरील लोखंडी पाटी ही १२ ते १५ फुट उंचीवर उडाली. स्फोटामुळे संपुर्ण परिसरात प्रचंड धमाक्याचा ५०० मिटरपर्यंत आवाज झाला. यामुळे नागरीकांनी त्या घटनेच्या ठिकाणी धाव घेत, जखमींना तत्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एल. पवार यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. रुग्णालयात घटनेचे वृत कळताच, नागरीकांची मोठी गर्दी झाली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जे नव्हतं घडायला, तेच झालं! भारताच्या T20 World Cup मोहिमेला धक्का, स्टार खेळाडूची स्पर्धेतून माघार; अनकॅप्ड खेळाडूचा आधार

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

SCROLL FOR NEXT