Kiran Kumar Khedkar, Dinesh Bhadane, Sandeep Gosavi, Sunil Padvi, Mohan Dhamdhere, Vishal Nagre etc. of the local crime branch while taking action against the illegal ganja planter in the banana field at Nawanagar (T.Shahada). esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : केळीच्या बागेत गांजाची लागवड; नवानगरला पावणेआठ लाखाचा गांजा जप्त

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : नवानगर (ता.शहादा) येथे केळीच्या शेतात गांजाची केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शोध शाखेच्या पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन ७ लाख ७४ हजार रुपये किमतीचा २ क्विंटल ५३ किलो गांजा जप्त केला आहे.(Marijuana worth eight lakh seized from Nawanagar at banana farm nandurbar crime news )

नवानगर (ता.शहादा) येथील एकाने त्याचे केळी पिकाचे शेतात बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांना माहिती त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर त्यांचे पथक नवानगर शिवारातील वडगांव ते नवानगर रस्त्यावर एका केळीच्या शेतात गेल्यावर त्यांना गांजाची रोपे आढळून आली.

तर काही रोपे ही खोडापासून कापलेले एका ठिकाणी जमा करून ठेवल्याचे दिसून आले. पथकाने संपूर्ण केळीचे शेत पिंजून काढले असता त्यांना २ क्विंटल ५३ किलो ५८४ ग्रॅम वजनाचे १७ लाख ७४ हजार ६२६ रुपये किमतीची गांजाची झाडे मिळून आले.

पोलिस आल्याची चाहूल लागताच शेताजवळ असलेला संशयित पळून जात असताना पोलिसांनी त्यास अटक केली. सुनील मेरसिंग चव्हाण ( वय-४७ वर्षे, रा. नवानगर, ता.शहादा) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलिस हवालदार संदीप गोसावी, पोलिस नाईक सुनील पाडवी, मोहन ढमढेरे, विशाल नागरे, बापू बागूल, पुरुषोत्तम सोनार, विकास कापुरे, अविनाश चव्हाण,पोलिस अंमलदार विजय ढिवरे, शोएब शेख, दीपक न्हावी, यशोदीप ओगले, हेमंत बारी, हेमंत सैंदाणे, उदेसिंग तडवी यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump ultimatum : ट्रम्प यांचा हमासला ४८ तासांचा अल्टिमेटम! ; म्हणाले, ‘’आता जर ऐकलं नाहीतर...’’

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Mehbooba Mufti Statement : ‘’लडाख, POKमध्ये Gen-Z… ’’ ; मेहबूबा मुफ्तींनी केलं मोठं विधान!

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT