election esakal
उत्तर महाराष्ट्र

Market Committee Election : जिल्ह्यात 72 जागांसाठी निवडणूक; मतदार नसलेल्यांना शेतकरी दाखला आवश्यक

सकाळ वृत्तसेवा

धुळे : जिल्ह्यातील धुळे, दोंडाईचा, शिरपूर व साक्री बाजार समित्यांच्या प्रत्येकी १८ याप्रमाणे एकूण ७२ जागांसाठी एप्रिलमध्ये निवडणुका होत आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आता उमेदवारांना एक लाख रुपये खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

मतदार नसलेल्या तालुक्यातील रहिवासी शेतकऱ्याला निवडणूक लढविता येणार आहे. (Market Committee Election for 72 seats in district Non voters require farmer certificate dhule news)

प्रथमच निवडणूक प्राधिकरणाने उमेदवारांना निवडणूक खर्चमर्यादा घालून दिली आहे. बाजार समितीसाठी एक लाख रुपये मर्यादा आहे. दहा आर शेती आणि बाजार समिती क्षेत्रातील रहिवासी असल्यास निवडणूक लढविता येणार आहे.

चारही बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. सेवा सहकारी संस्था- दोन मतदारसंघांतर्गत सर्वसाधारण गटासाठी सात, महिला प्रवर्गाकरिता दोन, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमातीसाठी प्रत्येकी एक, ग्रामपंचायत- चार मतदारसंघात सर्वसाधारण प्रवर्गासाठी दोन, अनुसूचित जाती-जमातीसाठी आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी प्रत्येकी एक, व्यापारी व अडते मतदारसंघात दोन तसेच हमाल व तोलारी मतदारसंघासाठी एक जागा, अशा चारही बाजार समित्यांसाठी प्रत्येकी १८ याप्रमाणे ७२ जागांसाठी निवडणुका होत आहेत.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

उमेदवारांना अर्ज, फोटो, आधारकार्ड, तलाठी यांचा रहिवासी दाखला (ग्रामसेवक अथवा पालिकेचा दाखला चालेल), दहा आर जमीन नावावर असलेला सात-बारा उतारा, सक्षम प्राधिकरणाचे शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र (मतदारयादीत नाव नसलेल्यांसाठी) आवश्यक आहे.

मागासवर्गीयांसाठी जातीचा दाखला व जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. आर्थिक दुर्बल घटकासाठी तहसीलदारांचे प्रमाणपत्र आवश्यक असेल. उमेदवारी अर्जाचे शुल्क २०० रुपये, सर्वसाधारण जागेसाठी अनामत रक्कम पाच हजार रुपये, तर राखीव जागांसाठी अनामत एक हजार रुपये असेल. प्रथम येणाऱ्याला प्राधान्याने चिन्हे देण्यात येतील.

प्राधान्यक्रमाने चिन्हांचे वाटप

एकूण सभासदांच्या ३० टक्के उमेदवारांनी म्हणजे किमान पाच लोकांनी गट अथवा पॅनल तयार करून एकच चिन्ह मागितल्यास त्यांना प्राधान्यक्रमाने चिन्ह देण्यात येईल. चष्मा, ट्रॅक्टर, शिडी, घड्याळ, शंख, बल्ब, आंबा, किल्ली-कुलूप, तारा, नगारा, पाण्याचा जग ही चिन्हे निवडणुकीत वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT