Marriage-Package
Marriage-Package 
उत्तर महाराष्ट्र

लग्न सोहळ्यांसाठी ‘पॅकेज’ला पसंती

सकाळवृत्तसेवा

जळगाव - विवाह सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक मानला जातो. हा सोहळा आता केवळ विधींपुरताच मर्यादित राहिला नसून, लग्नाकडे ‘ग्लॅमरस इव्हेंट’ म्हणून पाहिले जात आहे. हा इव्हेंट खास व्हावा, यासाठी वर, वधूबरोबर त्यांचे कुटुंबीयही प्रयत्नशील असतात. लग्नमंडपाच्या सजावटीपासून फोटोशूट, लग्नात खमंग पदार्थ वऱ्हाडींना देण्यापर्यंत सर्व व्यवस्था अगदी चोख करण्यासाठी पालकांची ‘पॅकेज’ सिस्टिमला पसंती मिळत आहे.

लग्नाची शॉपिंग, मेहंदी, हळद, सीमंती पूजन यानुसार कपड्यांची थीम, त्याचबरोबर लग्नस्थळी रोषणाई, फुलांच्या पाकळ्यांनी स्वागत आदींद्वारे हा सोहळा दिमाखदार बनविण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वेडिंग प्लॅनर अथवा पॅकेज सिस्टिम देण्यावर नागरिकांचा भर आहे. नवरीसाठी डोली, नवरदेवासाठी घोडा, बॅन्ड, बग्गी यांचीही मागणी पॅकेजमध्ये केली जात असल्याने कोणतीही धावपळ न करता शाहीविवाह सोहळ्याचे स्वप्न पालक या माध्यमातून पूर्ण करीत आहेत.

लॉन्सकडे वाढता कल 
हल्ली थीम वेडिंग हा प्रकार प्रत्येकालाच हवाहवासा वाटत आहे. थीमनुसार डेकोरेशन, तसे कपडे, दागिने घालण्याला पसंती दिली जाते. लॉन्सवर थीम वेडिंग करण्यास ऐसपैस जागा गरजेची असते. हवे तसे डेकोरेशन करता येत असल्याने कार्यालयांपेक्षा लॉन्सवर लग्न करण्याचा हा ट्रेंड हल्ली मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. थिम्सवर आधारित आकर्षक देखावे, रंगीत कारंजे, फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या साहित्याची सजावट करून लग्नमंडप सजविण्यात येतात. यामुळे इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनाही चांगले दिवस आले आहेत.

लॉन्स, कार्यालयातच पॅकेजेस 
लग्नाचा हॉल, होमकुंड, सुपाऱ्या, भटजी, पाट, चौरंग, अगदी समईच्या वाती, आतषबाजीसाठीचे फॅन्सी फटाके या व अशा अनेक वस्तूंसाठी ऐन लग्नाच्या गडबडीत मोठी पळापळ होते. लग्नाच्या आनंदावरही त्यामुळे विरजण पडू शकते. हे टाळण्यासाठी आता लॉन्स, कार्यालयांनीच पुढाकार घेतला आहे. हॉलबरोबरच या सर्व वस्तू त्यांच्याकडून पॅकेजनुसार पुरविल्या जात आहे. शहरातील अनेक कार्यालये, लॉन्सचालकांनी दोन लाखांपासून पुढे असे पॅकेजेस उपलब्ध करून दिले आहे. 

नाश्‍त्यापासून जेवणापर्यंत
लग्न चांगले झाले की नाही अशी प्रतिक्रिया पाहुणे जेवण व नियोजन पाहून देत असतात. लग्नातील जेवण चांगले असेल तर पाहुणे मंडळी खूश असतात. त्यामुळे लग्नातील सजावटीबरोबर जेवणाची देखील काळजी घेतली जाते. नाश्‍त्यापासून जेवणापर्यंतचे पॅकेजेस केटरर्सकडून देण्यात येतात. महाराष्ट्रीयन पंचपक्वाने, वेलकम ड्रिंक्‍स, रंगीबेरंगी मॉकटेल्स, पंजाबी, राजस्थानी, चायनीज, इटालियन, चाट, केळीच्या पानाच्या पंगतीपासून, बुफेपर्यंत आणि त्यानंतर रुचकर पानापर्यंत सर्व काही केटरर्सकडून पुरविले जातात. दीडशे रुपये थाळीपासून पुढे जितक्‍या पदार्थांचा समावेश होईल, त्यानुसार केटरिंगचे पॅकेज ठरत आहे.

तुळशी विवाहानंतर लग्नकार्याला सुरवात होईल. मात्र आतापासूनच बुकिंग झाल्या आहेत. यात अधिक मागणी ही पॅकेजला मिळत आहे. स्वादिष्ट व उत्तम जेवण देण्याकडे नागरिकांचा कल आहे.
- सुधाकर महाजन (सद्‌गुरू कृपा केटर्स)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT