Mayor Pratibha Chaudhary speaking at the water issue meeting esakal
उत्तर महाराष्ट्र

Water Supply | सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी उपाय करा : महापौर प्रतिभा चौधरी

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील नागरिकांना सुरळीत व नियमित पाणीपुरवठ्याच्यादृष्टीने जलवाहिन्यांवरील गळत्या रोखा, मुख्य जलवाहिन्यांवरील नळ कनेक्शन्स बंद करा, नळांना तोट्या बसविण्याबाबत संबंधित नागरिकांना सूचना द्या,

असे निर्देश नवनिर्वाचित महापौर (Mayor) प्रतिभा चौधरी यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले. (mayor give instructions about smooth water supply to officers employees of water supply department dhule news)

महापौर चौधरी यांनी त्यांच्या दालनात शुक्रवारी (ता. १०) पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. उपमहापौर नागसेन बोरसे, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, महिला बालकल्याण समिती सभापती सारिका अग्रवाल, उपसभापती विमलबाई पाटील, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, आयुक्त देवीदास टेकाळे, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त विजय सनेर, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत उगले, एन. के. बागूल, ओव्हरसियर, फिटर, व्हॉलमन आदी उपस्थित होते.

शहरातील ज्या भागात अनियमित पाणीपुरवठा होतो, त्या भागात सुरळीत पाणीपुरवठ्याची जबाबदारी संबंधित व्हॉलमन, ओव्हरसियर यांची आहे. त्यामुळे ज्या- ज्या ठिकाणी जलवाहिन्यांना गळती आहे, त्याची यादी संबंधित ओव्हरसियर यांना द्यावी, ओव्हरसियर्सनी या गळत्या रोखून त्या- त्या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करावा.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यासाठी ओव्हरसियर्सनी झोनवाईज व्हॉटसॲप ग्रुप तयार करून गळत्यांची माहिती देऊन आवश्‍यक कार्यवाही करावी. शहरातील सर्व गळत्या रोखण्यासाठी कार्यवाही करावी. त्याची माहिती सादर करावी.

तसेच, झोपडपट्टी भागात ज्या नळांना तोट्या नाहीत त्यांची माहिती घेऊन आठ दिवसाच्या आत त्या भागातील नळांना तोट्या लावण्याबाबत नागरिकांना सूचना द्या, असे निर्देश महापौर चौधरी यांनी दिले. शिवाय मुख्य जलवाहिन्यांवर नळ कनेक्शन्स असतील, तर ते बंद करण्याची कार्यवाही करावी. शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होईल यादृष्टीने नियोजन करावे, असेही महापौर चौधरी यांनी अधिकारी- कर्मचाऱ्यांना सुचविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT