Card Not Read Alert in ATM esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar : एटीएम मशिनमध्ये ‘Card Not Read’चा संदेश

सम्राट महाजन

तळोदा (जि. नंदुरबार) : येथील स्टेट बँकेच्या (SBI) एटीएम मशिनमधून ग्राहकांना पैसे काढताना मशिनमधील तांत्रिक अडचणीमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. एटीएम मशिन काही ग्राहकांचे एटीएम कार्ड (ATM Card Read) रीड करीत आहे तर काहींचे करत नसल्याने ग्राहकांना माघारी फिरत आहे. एकंदरीत यामुळे ग्राहकांची गैरसोय होत असल्याने, एटीएम मशिनसंबंधी (ATM Machine) असलेली तांत्रिक अडचण दूर करावी अशी मागणी ग्राहकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. (Message of Card Not Read in ATM machine in Nandurbar News)

शहरातील नवीन वसाहतीत न्यू हायस्कूल शेजारी भारतीय स्टेट बँकेची तळोदा शाखा असून यात एका स्वतंत्र खोलीत एटीएम मशिन व पासबुक प्रिंटिंग मशिन ग्राहकांचा सोयीसाठी उपलब्ध करून दिले आहे. स्टेट बँकेत शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबतच विविध शासकीय योजनेचे लाभार्थी तसेच शाळेतील, महाविद्यालयातील विद्यार्थी त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांची खाती मोठ्या प्रमाणावर आहेत. स्टेट बँकेच्या ग्राहकांची संख्या लक्षात घेता येथील एटीएम मशिनमध्ये पैसे काढण्यासाठी नेहमीच ग्राहकांची गर्दी असते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून स्टेट बँकेच्या एटीएम मशिनमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने मशिनमध्ये ग्राहकाने एटीएम कार्ड टाकल्यावर ‘टेक युअर कार्ड, कार्ड नॉट रीड’ असा संदेश ग्राहकांना मिळत असून त्यामुळे माघार फिरावे लागत आहे. कधी तरी एखाद्या ग्राहकाचे मशिन कार्ड रीड करीत असल्याची स्थिती आहे.

स्वतंत्र व्यवस्था करावी
येथील स्टेट बँकेच्या शाखेत आर्थिक व्यवहारासाठी ग्राहकांची नेहमीच मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. याठिकाणी ग्राहकांना खात्यात पैसे भरण्यासाठी व खात्यातून पैसे काढण्यासाठी एकच काउंटर असल्याने, ग्राहकांना रांगेत एक ते दोन तास ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे खात्यात पैसे भरण्यासाठी व खात्यातून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना स्वतंत्र काउंटरची सोय उपलब्ध करावी. जेणेकरून ग्राहकांना ताटकळत उभे राहावे लागणार नाही असे ग्राहकांमधून बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात...

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT