esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : सतारे (ता. शिंदखेडा) येथील १६ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी संशयितावर शिंदखेडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. (minor girl was abducted dhule crime news)

पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की रविवारी (ता. १५) रात्री नऊला संबंधित मुलगी गावात मेंदी रेखाटण्यासाठी जाते, असे सांगून घरातून गेली होती. रात्री बारापर्यंत ती घरी आली नाही म्हणून गावात ठिकठिकाणी जाऊन मुलीचा शोध घेतला; परंतु ती मिळून आली नाही.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

त्या वेळी समजले, की संशयित जितू छोटू भिल व समाधान पुन्हा भिल हे सकाळपासून गावात फिरत होते. त्यांनीच माझ्या मुलीला पळवून नेले असावे, असा संशय आल्याने संशयित राहत असलेल्या (बळसाणे, ता. साक्री) येथे जाऊन जितू भिलच्या घरी गेलो त्या वेळी जितू भिल याचे वडील व छोटू भिल आई भुराबाई छोटे भिल घरी होते. त्यांना मुलीबाबत विचारपूस केली त्या वेळी त्यांनी ‘तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या’ असे फिर्यादीत नमूद केले आहे. या

प्रकरणी संशयित जितू छोटू भिल, छोटू भिल, भुराबाई भिल, समाधान भिल व सागर भिल (सर्व रा. बळसाणे, ता. शिंदखेडा) यांच्यावर शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार सदेसिंग तपास चव्हाण करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान आशिया कप लढत! रेकॉर्ड्स, स्टॅट्स आणि संभाव्य विजेता कोण?

मोठी बातमी! विभक्त रेशनकार्डधारक सूना ‘लाडकी बहीण’साठी पात्र; पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, पण ४ लाखांवर लाभार्थी पत्त्यावर सापडल्याच नाहीत

आजचे राशिभविष्य - 14 सप्टेंबर 2025

साप्ताहिक राशिभविष्य : (१४ सप्टेंबर २०२५ ते १९ सप्टेंबर २०२५)

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT