crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : सरपंच, ग्रामसेवकासह चौघांवर गुन्हा; वैयक्तिक शौचालय अनुदानात 10 लाखांचा गैरव्यवहार

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : लाभार्थ्यांच्या वैयक्तिक शौचालय अनुदानात दहा लाखांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी विटाई (ता. साक्री) येथील तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकासह चौघांवर साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

८४ लाभार्थ्यांचे वैयक्तिक शौचालय अनुदान नियमबाह्य पद्धतीने ठेकेदाराला वाटप करून शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.()

हर्शल दर्यावगीर महंत (रा. १०९, विनोदनगर, वलवाडी, देवपूर, धुळे) यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की विटाई (ता. साक्री) ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच भीमराव भास्कर खैरनार, वकील मोतीलाल खैरनार, तत्कालीन निलंबित ग्रामसेवक रवींद्र सदाशिव वाघ व कर्मचारी युवराज हिराजी भामरे यांनी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)अंतर्गत विटाई ग्रामपंचायतीला २०१६-१७ ते २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकूण ३२६ लाथार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदान वाटप करण्यासाठी ३९ लाख १२ हजार रुपये अनुदान पंचायत समिती स्तरावरून वितरित झाले.

हे अनुदान संबंधित लाभार्थ्यांना रेखांकित धनादेशाद्वारे वितरित करण्याबाबत स्पष्ट निर्देश होते. तरीही अनुदान लाभार्थ्यांना धनादेशाद्वारे अदा न करता संबंधित ठेकेदाराला मोठ्या रकमा अदा करून ग्रामपंचायतीने ८४ लाभार्थ्यांचे सुमारे दहा लाख आठ हजारांचे अनुदान नियमांचे पालन न करता गंभीर स्वरूपाचा आर्थिक व्यवहार करत आर्थिक अनियमितता केली.

तसेच ३ ऑक्टोबरला पंचायत समिती स्तरावरून संबंधितांना अपहाराची वसूलपात्र रक्कम भरणा करण्याबाबत नोटीस देऊनदेखील रक्कम भरणा केली नाही. त्यामुळे चौघांनी अधिकाराचा दुरुपयोग करून संगनमताने ८४ लाभार्थ्यांचे वैयक्तिक शौचालय अनुदान नियमबाह्य पद्धतीने ठेकेदाराला वाटप केले व यातून शासनाची फसवणूक केली. सुमारे दहा लाख आठ हजारांच्या शासकीय रकमेचा गैरव्यवहार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून साक्री पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT