MLA
MLA 
उत्तर महाराष्ट्र

आजी-माजी आमदारांवर भाजप नेतृत्वाचा डोळा

सकाळवृत्तसेवा

नाशिक - ‘साथ आएंगे तो उन्हे भी जिताएंगे, नहीं आएंगे तो पटक देंगे’ या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या इशारावजा धमकीला शिवसेनेने स्वबळानेच निवडणूक लढविण्याचे उत्तर दिल्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, भाजपकडून संभाव्य उमेदवार कोण याची चाचपणी सुरू झाली आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसला टक्कर देणारा खमक्‍या उमेदवार शोधताना मनी, मसल पॉवरसह सर्वमान्य उमेदवार शोधताना आजी-माजी आमदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची तयारी भाजपकडून सुरू झाली असून, पक्षश्रेष्ठींकडून संभाव्य उमेदवारांचे अहवाल मागविण्यात आल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीला शंभरपेक्षा कमी दिवस शिल्लक राहिल्याने त्यादृष्टीने राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपच्या नेतृत्वाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मित्रपक्षांना गोंजारण्यास सुरवात केली. महाराष्ट्रात शिवसेना भाजपचा जवळचा मित्र असल्याचे गुणगान गात असले तरी गेल्या साडेचार वर्षांत महाराष्ट्रातील जनतेने दोन्ही पक्षांचे वादही अनुभवले. भाजप नेत्यांनी मध्यंतरीच्या काळात सत्तेसह मुख्य कार्यक्रमांमधून शिवसेनेला दूर सारण्याचा प्रयत्न केल्याने पक्ष नेतृत्वाने स्वबळाचा नारा दिला. परंतु शिवसेनेची भूमिका बदलण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. शिवसेना अद्याप तरी भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेरीस लातूरला भाजपच्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला ‘पटक देंगे’चा संदेश देण्याची वेळ आली. शहा यांच्या वक्तव्याची शिवसेनेने तत्काळ दखल घेत जशास तसे उत्तर दिल्याने लोकसभेत युतीबाबत साशंकता निर्माण झाली. भाजप-शिवसेना युती होईल या शक्‍यतेने भाजपमधील इच्छुकांनी पूर्वी पत्ते ओपन केले नाहीत; परंतु पटक देंगे भाषा व शिवसेनेच्या प्रत्युत्तरानंतर इच्छुकदेखील सरसावले आहेत.

कोकाटे, हिरे, आहेरांच्या नावाची चर्चा
माजी मंत्री प्रशांत हिरे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजपच्या इच्छुकांच्या यादीतून आपोआप त्यांचे नाव वगळले. सिन्नरचे माजी आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांचे नाव सध्या चर्चेत आले आहे. कोकाटे हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक आहेत. त्याशिवाय राणे भाजपच्या जाहीरनामा समितीवर असल्याने त्यांच्याकडून समर्थक कोकाटे यांचे नाव पुढे केले जाण्याची शक्‍यता आहे. महापालिकेचे सभागृहनेते दिनकर पाटील यांनीसुद्धा लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. ऐनवेळी आमदार डॉ. राहुल आहेर व सीमा हिरे यांचे नावदेखील पुढे येऊ शकते, असे भाजप जाणकारांचे मत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT