Jaykumar-Rawal
Jaykumar-Rawal esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News | धुळे जिल्ह्याला 75 कोटी वाढीव निधी द्या : आमदार जयकुमार रावल

सकाळ वृत्तसेवा

धुळे : जिल्हा नियोजन समितीसाठी धुळे जिल्ह्याला वाढीव ७५ कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी माजी मंत्री तथा शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठकीत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

धुळे जिल्हा नियोजन समितीच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यासाठी राज्यस्तरीय बैठक झाली. अर्थमंत्री फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहातून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे, तर आमदार रावल, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार काशीराम पावरा, आमदार फारूक शाह धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातून बैठकीत सहभागी झाले. (MLA Jayakumar Rawal statement Give 75 crore additional funds to Dhule district News)

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

धुळे जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन समितीला गेल्या वर्षी २११ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, त्या वेळी वाढीव २५ कोटींचा निधी देण्यात आला होता. त्यानुसार २३६ कोटींचा निधी धुळे जिल्ह्यासाठी मंजूर झाला.

तो कायम न ठेवता या वेळी २११ कोटींचा प्रारूप आराखडा सादर करण्यात आला असून, त्यात अतिरिक्त ७५ कोटींची वाढ करावी, अशी मागणी आमदार रावल यांनी केली. प्रारूप आराखड्यात जी तरतूद करण्यात आली आहे, त्यातून ग्रामीण भाग आणि नागरी भागाला पुरेसा न्याय मिळू शकत नाही,

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

त्यामुळे अतिरिक्त ७५ कोटी रुपये देऊन त्यात जनसुविधा, नागरी सुविधा, नावीन्यपूर्ण योजना, ३०५४, ५०५४, दलित वस्ती सुधार योजना, जलसंधारण विभागाची कामे, विद्युत विभागाची कामे यांसारखी कामे त्यातून मार्गी लावता येतील, असे आमदार रावल यांनी सुचविले.

त्यावर अर्थमंत्री फडणवीस यांनी सध्या आचारसंहिता असल्याने काही घोषणा करता येणार नाही. मात्र या मागण्यांचा निश्चित सकारात्मक विचार करून निर्णय घेतला जाईल, असे सांगितल्याचे आमदार रावल यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT