Kunal Patil discussing with Amita Patil on issue of limit increase Municipal Corporation. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : हद्दवाढ गावांतील समस्या मार्गी लावा : आमदार कुणाल पाटील

धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील आणि महापालिका हद्दीत समाविष्ट गावांतील मोराणे प्र.ल., बाळापूरसह पाणीटंचाई भासणाऱ्या गावांत तत्काळ पिण्याच्या पाण्याची सोय करणे अन...

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील आणि महापालिका हद्दीत समाविष्ट गावांतील मोराणे प्र.ल., बाळापूरसह पाणीटंचाई भासणाऱ्या गावांत तत्काळ पिण्याच्या पाण्याची सोय करणे, मालमत्ता कर कमी करणे.

रस्ते, गटारी, पथदीप अशा विविध मागण्यांसाठी आमदार कुणाल यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता-दगडे पाटील यांच्याशी महापालिकेतील संयुक्त बैठकीत चर्चा केली. (MLA Kunal Patil statement of Solve problems in demarcated village Dhule News)

संबंधित गावांतील नागरिकांचे प्रश्‍न तत्काळ मार्गी लावले जातील, नागरिकांची पुन्हा तक्रार येणार नाही, असे सांगत आयुक्त दगडे-पाटील यांनी बैठकित सकारात्मक भूमिका मांडली. महापालिका क्षेत्रांतर्गत हद्दवाढीतील ११ गावांतील पाणीप्रश्‍नासह विविध समस्या सोडविण्यासाठी वलवाडी, नकाणे, भोकर.

मोराणे प्र.ल., महिंदळे, अवधान, चितोड, बाळापूर, पिंप्री आणि वरखेडे येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत आमदार पाटील यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठक झाली.

हद्दवाढ गावांतील ४० कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायम सामावून घेण्यात यावे, महापालिका हद्दीतील या गावांतील बखळ जागा, खळे, गोठे, गावठाण, जुनी मालमत्ता घरे आदींना आकारलेला मालमत्ता कर कमी करणे, सिटी सर्व्हे लागू करणे, गटारी, रस्ते, पाणी, वीज, पथदीप, आरोग्य, स्वच्छता, नियमित घंटागाडी येणे.

मलनिस्सारण, तसेच वरखेडी रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेला कचरा, बेशिस्त वाहतुकीमुळे प्रवाशांमध्ये अपघाताची भीती, त्यामुळे वरखेडी रोडवर कचऱ्याचे व्यवस्थापन आदी समस्या गाव पदाधिकाऱ्यांनी मांडल्या. हद्दवाढीतील गावांचे प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्यात यावेत, अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी केली.

मोराणे प्र.ल., बाळापूर गावासह हद्दवाढ गावांतील पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न त्वरित मार्गी लावावा, अशीही मागणी बैठकीत झाली. आयुक्त तथा प्रशासक दगडे- पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत समस्या तातडीने मार्गी लावल्या जातील, असे सांगितले.

तसेच मोराणे प्र.ल., बाळापूर गावातील पाणी समस्या आठवड्यात मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्तांनी सूचना दिल्या. उपायुक्त संगीता नांदुरकर, अभियंता कैलास शिंदे, कर मूल्यांकन अधिकारी पल्लवी शिरसाट, माजी सरपंच भटू चौधरी, छोटू चौधरी, वाल्मीक वाघ, जिल्हा बँकेचे संचालक भगवान पाटील.

विशेष कार्य अधिकारी प्रकाश पाटील, नगरसेवक शब्बीर पिंजारी, ज्ञानेश्‍वर मराठे, बापू खैरनार, प्रवीण सोनवणे, सुनील ठाकरे, जगदीश चव्हाण, चुनिलाल पाटील, अनिल चित्ते, आबा पाटील, विजय देसले, सादिक शेख, अरुण वाघ, भूषण वाघ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk : फडणवीसांनी घडवला इतिहास! Starlink चं इंटरनेट सगळ्यांत पहिलं महाराष्ट्रात.. इलॉन मस्कच्या कंपनीसोबत झाला करार

अप्पी आणि अमितने ८ वर्ष का लपवून ठेवलं त्यांचं नातं? स्वतः सांगितलं कारण; म्हणाले- आम्हाला अजिबात...

AUS vs IND: भारताच्या फिरकी जाळ्यात अडकले ऑस्ट्रेलियन्स! चौथा T20I जिंकून टीम इंडियाची मालिकेत आघाडी

Latest Marathi Live Update News : दक्षिण मुंबईतील मरीन लाईन्स परिसरातील इमारतीला मोठी आग, घराल माणसं अडकल्याची भीती

Beautiful Villages India: निसर्गाचा गुपित! भारतातील 5 सुंदर गावं जे तुम्हाला मंत्रमुग्ध करतील

SCROLL FOR NEXT