mokhada
mokhada 
उत्तर महाराष्ट्र

आगामी निवडणूकीसाठी राष्ट्रवादीने रणशिंग फुंकले

भगवान खैरनार

मोखाडा - आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना आणि भाजपने पदाधिकार्यांच्या नियुक्तया केल्या आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा कार्यकारीणीसह विधानसभा, तालुका आणि शहर अध्यक्षांच्या नियुक्तया केल्या आहेत. त्याच बरोबर जिल्हयातील विक्रमगड, डहाणू आणि पालघर विधानसभेच्या जागांवर लक्ष केंद्रीत करून, माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी विक्रमगड मध्ये झालेल्या महा मेळाव्यात आगामी निवडणूकीचे रणशिंग फुंकले आहे. 

आगामी 2019 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जिल्हयात प्राबल्य असलेल्या शिवसेना आणि भाजप ने विविध पदाधिकार्यांच्या नियुक्तया केल्या आहेत. आणि पक्षबांधणीवर भर दिला आहे. तसेच प्रत्येक विधानसभा क्षेत्रानुसार बैठका सुरू केल्या आहेत. जिल्ह्य़ात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भुमिका बजावत असलेल्या राष्ट्रवादी काॅग्रेस ने ही आगामी निवडणूकीसाठी कंबर कसली आहे. त्यासाठी विक्रमगड मध्ये माजी मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पक्षाचा महा मेळावा घेण्यात आला आहे. 

या मेळाव्यात आघाडी धर्मात पालघर विधानसभा काँग्रेस कडे आहे मात्र, येथे राष्ट्रवादी ची ताकद वाढली असून तो आपल्या कडे घ्यावा अशी आग्रही मागणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. त्यानुसार गणेश नाईक यांनी विक्रमगड, डहाणू आणि पालघर या विधानसभा निवडणूका लढण्यासाठी कार्यकर्त्यानी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन करीत आगामी निवडणूकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हा कार्यकारीणी सह विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष, तालुका व शहर अध्यक्षांच्या नियुक्तया केल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस ने आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णु सवरा, भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष व आमदार पास्कल धनारे आणि खासदार राजेंद्र गावीत यांचे अनुक्रमे विक्रमगड, डहाणू आणि पालघर विधानसभा मतदारसंघांना लक्ष केले आहे. 

या मेळाव्यात गणेश नाईक, आमदार आनंद ठाकूर आणि सुनिल भुसारा यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर आणि निर्णयांवर सडकून टिका ही केली आहे. मेळाव्यास आमदार आनंद ठाकूर, जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांसह जिल्हयातील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT