Prakash Patil esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : मला कोणी न्याय देईल का न्याय! पीएम किसानची रक्कम दुसऱ्याच्या खात्यात

शेतकरी प्रकाश नथ्थू पाटील यांचे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील नऊ हप्त्यांचे १८ हजार दुसऱ्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाले

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील अल्पभूधारक शेतकरी प्रकाश नथ्थू पाटील यांचे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील नऊ हप्त्यांचे १८ हजार दुसऱ्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाले आहेत. महसूल विभागाच्या हलगर्जीमुळे हा प्रकार झाला आहे. (money from Pradhan Mantri Kisan Samman Yojana was credited to another farmers account dhule news)

हे पैसे परत मिळावे म्हणून पाटील यांनी तलाठ्यापासून थेट आयुक्तांपर्यंत तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यांच्या पदरी निराशा आली असून तक्रार करुन साधी चौकशीही झालेली नाही. ही रक्कम मला परत मिळत नसेल, तर शासनाकडे तरी जमा व्हावी, अशी मागणी पाटील यांची आहे.

न्याय मिळण्यासाठी २६ जानेवारीपासून तलाठी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे एकंदरीत श्री. पाटील यांच्यावर मला कोणी न्याय देईल का न्याय..! असे म्हणण्याची वेळ आली आहे.

प्रकाश पाटील अल्पभूधारक शेतकरी आहेत. ते पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत. हा लाभ मिळण्यासाठी त्यांना महसूलसह कृषी विभागाशी खूप झगडावे लागले आहे. त्यांचा बॅंक खाते क्रमांक महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी चुकविला अन् चक्क नऊ हप्ते दुसऱ्याच्या खात्यात जमा झाले. ती रक्कम अठरा हजार आहे. ही रक्कम अद्यापही परत मिळालेली नाही.

महसूल विभागाची हलगर्जी

पाटील यांना खाते क्रमांक दुरुस्तीसाठी महसूल विभागाकडे बऱ्याच फेऱ्या माराव्या लागल्या. आता स्वतःच्या खात्यात रक्कम जमा होऊ लागली आहे. मात्र दुसऱ्याच्या खात्यात जमा झालेली रक्कम परत व्हावी यासाठी लढा सुरू आहे.

यावेळी श्री. पाटील यांनी ज्या शेतकऱ्याच्या खात्यात ही रक्कम अदा करण्यात आली आहे. त्या शेतकऱ्याच्या खात्यातील रक्कम शासनदरबारी जमा करण्यासाठी तहसीलदार यांच्यापासून आयुक्तापर्यंत निवेदन पोचविले आहे.

संबंधित विभागाने निवेदनाची दखल घेतली आहे. मात्र शेतकऱ्यास अद्यापही वसुलीसाठी नोटीस पाठविलेली नाही. ती रक्कम मला नकोय. पण शासन खात्यात परत व्हावी. यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू केला आहे.

...नाहीतर बेमुदत उपोषण

संबंधित शेतकऱ्याकडून वसूल करण्यापेक्षा तत्कालीन तलाठी व मंडळाधिकारी यांना जबाबदार धरून रक्कम वसूल करावी. नऊ हप्त्यांची रक्कम वसूल न झाल्यास २६ जानेवारीपासून बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

T20 World Cup: मुंबईत नेपाळी प्रेक्षकांचा पुन्हा झाला हिरमोड; वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात वेस्ट इंडीजचा एकतर्फी विजय

सर्वांची लाडकी शेवंता अडकली लग्नबंधनात, अपूर्वा नेमळेकरने व्हॅलेटाईन डे दिवशी बांधली लग्नगाठ, नवरा आहे तरी कोण?

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT