More than 200 Gram Panchayat Election Awaited 
उत्तर महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणूक हालचाली गतिमान

सकाळ वृत्तसेवा

कापडणे: जिल्ह्यातील दोनशेपेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणूक हालचाली गतिमान झाल्या आहेत. प्रभागरचना निर्धारित झाल्यानंतर आजपासून आरक्षण सोडतींना प्रारंभ झाला. तालुक्‍यातील सर्वाधिक मोठ्या येथील ग्रामपंचायतीची आज आरक्षण सोडत काढण्यात आली. 2011 च्या लोकसंख्येनुसार आरक्षण काढल्याने नाराजी व्यक्त होत आहे. लोकसंख्या व मतदारांत केवळ दोन हजारांचा फरक आहे. सतरापैकी नऊ जागा महिलांसाठी राखीव आहेत.

जुलै व ऑगस्टमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. सरपंच जया पाटील अध्यक्षस्थानी होत्या. मंडलाधिकारी आर. बी. राजपूत, तलाठी विजय बेहरे, महसूल कर्मचारी रवींद्र कोतवाल, माजी उपसरपंच मनोज पाटील, प्रमोद पाटील, ज्ञानेश्वर पाटील, महेश माळी, चंद्रशेखर माळी, मनोज माळी, ग्रामविकास अधिकारी किशोर शिंदे, बन्सीलाल पाटील आदी उपस्थित होते. हर्शल दीपक पाटील या विद्यार्थ्याच्या हस्ते सोडत काढण्यात आली.

दरम्यान, 2011 च्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षण काढण्यात आले. प्रत्यक्षात लोकसंख्या पाच ते सात हजारांनी वाढली आहे. जुन्या लोकसंख्येमुळे नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण पदाच्या जागा कमी झाल्या आहेत. उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर माळी यांनी सांगितले.

कापडणेतील प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग एक : नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष एक, सर्वसाधारण दोन, एकूण जागा तीन. दोन : नामाप्र पुरुष एक, नामाप्र महिला एक, अनुसूचित जमाती महिला एक, एकूण जागा तीन. तीन : अनुसूचित जमाती महिला एक व पुरुष एक, एकूण जागा दोन. चार : नामाप्र महिला एक, सर्वसाधारण एक महिला, सर्वसाधारण एक, एकूण जागा तीन. पाच : नामाप्र महिला एक, सर्वसाधारण एक महिला, सर्वसाधारण एक, एकूण जागा तीन. प्रभाग सहा : अनुसूचित जाती महिला एक, सर्वसाधारण महिला एक, सर्वसाधारण एक, एकूण तीन जागा.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT