mother also died due to shock of her son death dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : मुलाच्या निधनाच्या धक्क्याने वयोवृद्ध आईनेही सोडला प्राण

योगीराज ईशी

Nandurbar News : येथील देवरे (माळी) कुटुंबातील पांडुरंग सोनू देवरे यांचे अल्प आजाराने आठवडाभरापूर्वी निधन झाले. (mother also died due to shock of her son death dhule news)

मुलाच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने क्रियाकर्म होण्याआधीच वयोवृद्ध आईनेही जगाचा निरोप घेतला. यामुळे गावासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. उतारवयात मुलाच्या खांद्यावर जाण्याच्या वेळेत आपल्या आधीच मोठ्या मुलाचा मृत्यू झाला. या विरहाने आईला धक्का बसला.

अन.. खाणे-पिणे बंद झाले. यातून प्रकृती खालावून एका आठवड्यात आईचेही निधन झाले. मुलाच्या व आईच्या निधनाने देवरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कळंबू (ता. शहादा) येथील निवृत्त वीज वितरण कर्मचारी झेंडू देवरे, रमेश देवरे यांच्या मातोश्री व भरत देवरे यांच्या आजी नवसाबाई सोनू देवरे यांचे वयाच्या शतकानंतरही खाणे-पिणे व्यवस्थित होते.

सुना, मुले, नातवंडे यांच्याकडून त्यांची काळजी घेतली जात असल्याने प्रकृती ठणठणीत होती, मात्र सुखकाळात मोठा मुलगा पांडुरंग देवरे यांचे आजारपणाने काही दिवसांतच निधन झाले. तो धक्का सहन न झाल्याने नवसाबाईंनीही प्राण सोडला. मुलगा व आईचा दशक्रिया विधी एकाच वेळी ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT