Shobha Zine and rukhma zine  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : विजेचा धक्काने सासू- सुनेचा मृत्यू; तारेवर कपडे सुकवतानाची दुर्दैवी घटना

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरातील साक्री रोडवरील बजरंग सोसायटीत बुधवारी (ता.१९) रात्री दुर्दैवी घटना घडली. घरातील तारेवर ओले कपडे सुकवताना विजेचा शॉक लागून सुनेसह सासूचा मृत्यू झाला.

शोभाबाई कृष्णा झिने (वय ३९) व रुखमाबाई पांडुरंग झिने (वय ६५, रा.प्लॉट क्रमांक ५४, बजरंग सोसायटी, महिंदळे शिवार, साक्री रोड, धुळे) असे मृत सून व सासूचे नाव आहे. (Mother in law along with daughter in law died due to electric shock dhule news)

शोभाबाई या बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास घरातील ओले कपडे तारेवर सुकवत होत्या. मात्र तारेमध्ये विद्युत प्रवाह असल्याने शोभाबाई यांना विजेचा धक्का बसला. त्यावेळी सासू रुखमाबाई या तेथे बसल्या होत्या. शोभाबाई तारेसह रुखमाबाई यांच्या अंगावर पडल्या.

त्यामुळे रुखमाबाई यांनाही विजेचा धक्का बसला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यात दोघींचा जागीच मृत्यू झाला. ही घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत घरातील वीजप्रवाह बंद करून दोघींना बाजूला केले.

घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, राजश्री पाटील व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याबाबत धुळे तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

SCROLL FOR NEXT