Stolen motorcycle with the accused in the police station, police inspector Sriram Pawar, Gaikwad and colleagues  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : मोटारसायकल, मोबाईलचोर दोंडाईचा पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : दोंडाईचा येथील योगिता रवींद्र नेतले यांच्या किराणा दुकानावरून ३१ मार्चला सायंकाळी विवो कंपनीचा मोबाईल चोरीस गेला होता. (Motorcycle mobile thief arrested by Dondaicha police dhule crime news)

मोबाईल चोरी करणारा योगेश शिवराज वाडिले (वय ३४, रा. रंजाने, ता. शिंदखेडा) पोलिसांच्या ताब्यात असून, अटक करण्यात येऊन त्याच्याकडून मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.

दोंडाईचा पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या दुसऱ्या घटनेत कन्हय्यालाल लोटन भिल (रा. खोकराळे, ता.जि. नंदुरबार यांची २० हजार रुपये किमतीची हीरो होंडा स्लेंडर मोटारसायकल (एमएच १८, पी ३८१५) दोंडाईचा बस स्टँडसमोरील हॉटेल नानासमोरून चोरीस गेली होती.

चोरटा विजय नारायण भिल (वय २५, रा. चिलाणे, ता. शिंदखेडा, जि. धुळे) याला अटक झाली असून, दोंडाईचा पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील मोटारसायकल हस्तगत केली आहे.

वरील कामगिरी पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर अन्साराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली संदीप कदम, अनारसिंग पवार, प्रवीण निंबाळे, प्रेमराज पाटील, अनिल धनगर यांनी केली. या चोरट्यांकडून आणखी इतर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे दोंडाईचा पोलिसांचे प्रयत्न सुरू असून, त्यानुसार तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav News : बिहारमध्ये निवडणुकीआधीच तेजस्वी यादव यांना एक नाहीतर तीन मोठे धक्के!

Sarfaraz Khan ला टीम इंडियातून वगळल्याने वाद; शमा मोहम्मद यांचे गौतम गंभीरवर मोठे आरोप, म्हणाल्या- तो खान म्हणून...

सगळे केस जळले पण चेहरा वाचला; धकधक गर्ल माधुरीने सांगितला दिवाळीचा भयानक अनुभव "मी अभिनेत्री नसते.."

'नटरंग'नंतर आता येणार 'फुलवरा'; रवी जाधव यांचा आणखी एक तमाशा पट, कोणते कलाकार दिसणार?

Latest Marathi News Live Update : दहिसर पूर्व अंबावाडीमध्ये फटाका फोडण्यावरून तरुणाला मारहाण

SCROLL FOR NEXT