Funding esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : ग्रामीण मतदारसंघासाठी 69 कोटींच्या निधीची तरतूद : खासदार डॉ. भामरे

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात पाठपुराव्याअंती १४ रस्त्यांसह अन्य कामांसाठी ६९ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात चौदा कामांना निधीसह मंजुरी मिळाली. (MP Dr bhamre statement of Provision of funds of 69 crore for rural constituencies dhule news)

मंजूर निधीतून सात ते देशशिरवाडे- अजनाळे-पाडळदे-रावेर-चितोड-धुळे-बिलाडी-हिवरखेडा रस्त्यांतर्गत काही भागाचे सिमेंट - काँक्रिटीकरण, दुतर्फा फुटपाथसह सिमेंट -काँक्रिट गटार, पथदीप, चितोडजवळ लहान पूलासाठी ८ कोटी रुपये, राज्य महामार्ग २११ ते मोरदड- मोरदड तांडा- कुंझर रस्त्याच्या काही भाग मजबुतीकरणासह सुधारणांसाठी ८ कोटी.

आर्वी-शिरूड-तरवाडे-भडगाव-नगरदेवळा रस्त्याची सुधारणा करणे ८ कोटी, राज्य महामार्ग ६० ते लोणकुटे-कापडणे-न्याहळोद-जापी-निमखेडी- कुंडाणे ते राज्य महामार्ग ६० रस्ता प्रजिमा ६० चे मजबुतीकरण, डांबरीकरण व जलनिस्सारणासह सुधारणा- ८ कोटी, राज्य महामार्ग ६० लोणकुटे-कापडणे- न्याहळोद-जापी-निमखेडी-कुंडाणे ते राज्य महामार्ग ६० चे मजबुतीकरण, डांबरीकरण व जलनिस्सारणासह सुधारणा- ८ कोटी.

नंदाळे-बोरकुंड-मांडळ ते आर्वी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणसह सुधारणा- ८ कोटी, धुळे शहरातील नेहरू चौक ते वाडीभोकर रस्ता ते गोंदूर विमानतळ रस्त्यात दुभाजकासह सिमेंट-काँक्रिट रस्ता, सिमेंट-काँक्रिट गटार, फुटपाथ बांधकाम, स्टेडिअम ते वलवाडी दरम्यान दुभाजकासह चौपदीरकरण करणे ८ कोटी.

बोरकुंड ते तरवाडे रस्त्याची सुधारणा करणे २.५ कोटी जुनवणे ते हेंद्रुण रस्त्याची सुधारणा करणे २ कोटी, सिताणे ते पिंजारपाडे रस्त्याची सुधारणा करणे- एक कोटी, धाडरे-ह्यादळ रस्त्याची सुधारणा करणे- दीड कोटी, नाणे ते होरपाडे रस्त्याची सुधारणा करणे- दीड कोटी, बोरकुंड-रतनपुरा ते रवाजे शिवार रस्त्याची सुधारणा- तीन कोटी, राज्य महामार्ग २११ ते नाणे रस्त्याची सुधारणा- २ कोटी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार-अमित शाह

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT