Deepotsav in villages (file photo)  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : गावागावात सोमवारी दीपोत्सव साजरा करा : खासदार डॉ. सुभाष भामरे

गावागावांत श्रीराम भक्तांसह नागरिकांनी आपल्या घरांच्या दारासमोर दीप लावून दीपोत्सव साजरा करावा असे आवाहन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त धुळे शहर तसेच मतदारसंघातील अन्य शहरे, गावागावांत श्रीराम भक्तांसह नागरिकांनी आपल्या घरांच्या दारासमोर दीप लावून दीपोत्सव साजरा करावा असे आवाहन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आज येथे केले.

लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील शहरासह गावागावात शनिवार (ता.२०) पासून सुमारे चार लाख दिव्यांचे वाटप करण्यात येणार असेही डॉ. भामरे म्हणाले. (MP Dr Subhash Bhamre statement of Celebrate Deepotsav in villages on Monday dhule news)

येथील पारोळा रोडवरील राम पॅलेस या संपर्क कार्यालयात शुक्रवारी (ता.१९) सायंकाळी पाचला खासदार डॉ. भामरे यांनी पत्रकार परिषद घेतली. धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे.

भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर प्रदीप कर्पे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस यशवंत येवलेकर, जिल्हा प्रवक्ता श्यामसुंदर पाटील, चेतन मंडारे, आकाश परदेशी, पंकज धात्रक आदी उपस्थित होते.

खासदार डॉ. भामरे म्हणाले, की अयोध्येमध्ये काही महिन्यांपासून श्रीराम जन्मभूमीच्या जागेवर रामलल्लाचे मंदिर साकारले जात आहे. या मंदिरात सोमवारी (ता.२२) दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे.

या सोहळ्यास श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास महाराज, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशातील सुमारे १२५ परंपरांचे संत-महापुरुष व देशातील सर्वशाखीय २५०० श्रेष्ठांची उपस्थिती राहणार आहे.

या सोहळ्यानिमित्त देशभरात स्थानिक पातळीवरही विविध धार्मिक कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांत लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील नागरिकांनीही उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार डॉ. भामरे यांनी केले.

आजपासून दिव्यांचे वाटप

श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील धुळे शहरासह मतदारसंघातील अन्य शहरांसह ग्रामीण भागातही शनिवार (ता.२०) पासून चार लाख दिव्यांचे वाटप करण्यात येत आहे.

भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे दिवे नागरिकांपर्यंत पोचविले जातील. नागरिकांनी रांगोळ्या काढाव्यात, आपले गाव, वसाहत, कॉलनीतील वातावरण राममय करावे, रामलल्लाच्या स्वागतासाठी मंगल गीते लावावीत, परिसरात प्रसादाचे वाटप करावे असे आवाहनही खासदार डॉ. भामरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT