st msrtc  esakal
उत्तर महाराष्ट्र

MSRTC News : स्मार्ट कार्ड नसले तरीही ST प्रवासात सवलत

सकाळ वृत्तसेवा

धुळे : राज्य परिवहन महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक घटकांना प्रवासभाड्यात सवलत देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट कार्ड योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. १ जून २०१९ पासून स्मार्ट कार्ड योजना सुरू आहे.

योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिक, पुरस्कारप्राप्त व्यक्ती, विद्यार्थी तसेच रुग्णांना स्मार्ट कार्ड देण्यात येते. एसटी महामंडळाने गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी तीन वर्षांपासून स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसह अनेक सवलतधारकांनी स्मार्ट कार्ड काढले आहे. स्मार्ट कार्ड असणाऱ्या नागरिकांनाच यापुढे बसमध्ये प्रवासाची सवलत दिली जाणार आहे. मात्र, महामंडळाने ज्या सवलतधारकांनी एसटीचे अद्याप स्मार्ट कार्ड काढलेले नाही किंवा अपरिहार्य कारणांमुळे नूतनीकरण झालेले नाही, अशा नागरिकांसाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत नोंदणीला मुदतवाढ दिली आहे.

हेही वाचा: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

तीस हजारांवर कार्डवाटप

जिल्ह्यात आतापर्यंत ३० हजार ७६८ ग्राहकांना स्मार्टकार्ड वितरित झाले आहे. यात धुळे आगारांतर्गत सर्वाधिक १५ हजार ८०५, साक्री आगारांतर्गत चार हजार ७८२, शिरपूर आगारांतर्गत तीन हजार ९७१, तर शिंदखेडा आगारांतर्गत तीन हजार ५९१ आणि दोंडाईचा आगारांतर्गत दोन हजार ६१९ प्रवाशांनी स्मार्ट कार्ड घेतले आहे. मुदत असेपर्यंत सवलतधारकांना एसटीचे स्मार्ट कार्ड नसले तरी बसमधून सवलतीमध्ये प्रवास करता येणार आहे. एसटीकडे विविध योजनांची स्मार्ट कार्डे आहेत. त्यांचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र, त्यानंतर त्यासाठी करावे लागणारे नूतनीकरण होत नसल्याच्या तक्रारी आहेत. सर्व्हरमुळे अडचण असल्याचे सांगण्यात येते.

२९ घटकांना प्रवास लाभ

एसटी महामंडळातर्फे दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक, विविध राज्य शासनाचे पुरस्कारप्राप्त नागरिक, शालेय विद्यार्थी, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, कर्करोग व इतर दुर्धर आजारग्रस्त, स्वातंत्र्यसैनिक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना, डॉ. आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त आदी प्रकारच्या २९ घटकांना प्रवासभाड्यात सवलत देण्यात येते. या सवलतधारकांना स्मार्ट कार्ड नोंदणीची सक्ती करण्यात आली आहे. गैरसोय होऊ नये म्हणून स्मार्ट नोंदणीची मुदत पुन्हा वाढविण्यात आली आहे. तसेच मुदत असेपर्यंत स्मार्ट कार्ड नसले तरी सवलतधारकांना बसमधून प्रवास करता येणार आहे. तरीही लाभधारकांनी लवकर नोंदणी करावी, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाने केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT