Flu H3N2
Flu H3N2 esakal
उत्तर महाराष्ट्र

H3N2 Flu | फ्लू, कोरोना संसर्गाबाबत दक्षता घ्या : महापालिका

सकाळ वृत्तसेवा

धुळे : सद्यःस्थितीत राज्यभरात फ्लू व कोरोना संसर्गाची लक्षणे असणारे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. तपासणी केल्यानंतर एच३एन२ (सीझनल फ्लू) व कोरोना असल्याचे निदान केले जात आहे. (municipal corporation appeal to Be careful about flu corona infection dhule news)

एच३एन२ (H3N2) हा सीझनल फ्लूचा व्हेरिएंट असून, संसर्गजन्य असल्याने रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले. या संसर्गजन्य आजाराची लक्षणे प्रामुख्याने सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, उलट्या, संडास, डोकेदुखी, एक आठवडा ते जास्त दिवस थकवा असू शकते.

या आजाराची गुंतागुंत होऊन मुख्यतः न्यूमोनिया किंवा रुग्णालयात दाखल होण्याची परिस्थिती निर्माण होते. या आजाराचा प्रभाव मुख्यतः १४ वर्षांखालील मुले, गर्भवती माता, रोगप्रतिकारशक्ती कमी असलेले व्यक्तींना व ६५ वर्षांवरील वृद्धांवर या आजाराचे गंभीर परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

मात्र, लवकरात लवकर उपचार घेतल्यास गुंतागुंत टळू शकते. या आजाराने घाबरून जाऊ नये, वेळेवर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा तसेच गर्दीत जाणे टाळावे, मास्क वापरावा, वारंवार हात धुवावेत, असे आवाहन महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर नागसेन बोरसे, आयुक्त देवीदास टेकाळे, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त विजय सनेर, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. एम. आर. शेख, आरसीएच ऑफिसर डॉ. संपदा कुलकर्णी यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT