The Municipal Encroachment Removal Team removed the encroachments in front of SSVPS College on Wednesday.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरूच; SSVPSसमोरील अतिक्रमणे हटविली

सकाळ वृत्तसेवा

धुळे : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शहरात बुधवारी (ता. १) पुन्हा अतिक्रमण (Encroachment) निर्मूलनाची कारवाई केली. (Municipal Corporation encroachment removal team again took action to remove encroachments in city on 1 march dhule news)

पथकाने शहरातील वडजाई रोड भागातील एक पक्के बांधकाम जमीनदोस्त केले, तर शहरातील देवपूर भागात एसएसव्हीपीएस महाविद्यालयासमोर व परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली.

महापालिकेकडून सध्या अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी चाळीसगाव रोड भागातील अतिक्रमणांवर महापालिकेने पोलिस बंदोबस्तात मोठी कारवाई केली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते चाळीसगाव चौफुलीदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा शंभरावर अतिक्रमणांवर जेसीबी फिरविला.

त्यानंतर ही मोहीम सुरू ठेवण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाकडूनही करण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारी देवपूर भागात एसएसव्हीपीएस महाविद्यालयासमोर व लगतच्या भागातील रस्त्यावरील २०-२२ अतिक्रमणे जेसीबीने हटविली. काही अतिक्रमणे संबंधितांनी स्वतः काढून घेतली. फळ, भाजीपाला विक्रेते, गॅरेज, चहा टपरी, मांसविक्रीची दुकाने, खाद्यपदार्थ आदी विविध अतिक्रमणांचा यात समावेश आहे.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख प्रसाद जाधव संतोष घटी, युवराज खरात, जाकिर बेग, सनी दुर्धळे, राहुल फुलपगारे, मोहन गवळी, चालक भूषण अहिरे, राहुल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. शहरातील अतिक्रमणांबाबत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनीही महापालिकेच्या माध्यमातून सर्व अतिक्रमणे काढली जातील, असे सांगितले.

एसएसव्हीपीएस महाविद्यालयासमोर पुरातन महादेव मंदिर होते. आज ते मंदिर तेथे अस्तित्वात नाही. तेथे आज मांसविक्रीची दुकाने आहेत. हे पाप कुणाचे आहे, हा प्रश्‍न आहे. भाजपने शहरात काय कामे केली ते सर्वांना माहिती आहे. शंभर टक्के कामे होऊ शकत नाहीत. पण शहरात भाजप व शिंदे सरकारने कामे दिली आहेत. कुणाच्या सूचनेने शहरासाठी कामे दिलेली नाहीत, असेही त्यांनी मागील पत्रकार परिषदेत म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT