murder esakal
उत्तर महाराष्ट्र

धुळ्यात भर दिवसा तरुणाचा खून

हातपाय बांधून तरुणाला हत्यारांनी मारहाण करण्यात आली, त्यातच त्याचा मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील अंबिका नगर येथे शुक्रवारी (ता.२०) भर दिवसा तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. हातपाय बांधून तरुणाला हत्यारांनी मारहाण करण्यात आली, त्यातच त्याचा मृत्यू झाला. जावेदअली शौकतअली सैयद (वय-३६ रा. मुस्लीमनगर, मुन्शी मशिदीजवळ, धुळे) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चौघांवर चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी रात्रीच यातील दोघांना अटक केली.

भिकनअली लियाकत अली सय्यद (रा. मुस्लीमनगर) याने चाळीसगाव रोड पोलिसात याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार शुक्रवारी (ता.२०) सकाळी दहा ते दुपारी बारादरम्यान जुनेद सलीम, तौसिफ कपाशी, शोएब ऊर्फ बबल्या सर्व (रा. धुळे) व एक साथीदार यांनी अज्ञात कारणावरून जावेदअली सय्यद याचे रुमालाने हातपाय बांधून त्याला पाठीवर, पोटावर व हातापायांवर लाकडी दांडक्याने व लोखंडी हत्यारांनी मारहाण केली. गंभीर जखमी करून त्याचा खून केला. अंबिका नगर भागातील सना स्कूल समोरील एका पत्र्याच्या शेडमधील खाटेवर तो मृतावस्थेत मिळून आला. या फिर्यादीवरून चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी जुनेद सलीम शेख (वय-२२) व तौसिफ शाह ऊर्फ तौसिफ कपाशी अजीज शाह (वय-२६, रा. पत्रेवाली मशिदीजवळ, अंबिका नगर) यांना अटक केली आहे एपीआय संदीप पाटील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT