A striking black Honda City car. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Accident News: रस्ता दाखविणे बेतले जिवावर; तळोदा-अक्कलकुवा रस्त्यावर होंडा सिटीची धडक

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Accident News : रस्ता चुकलेल्या वाहनाला रस्ता दाखवणाऱ्या व्यक्तीस काळ्या रंगाच्या होंडा सिटी गाडीने रात्रीच्या अंधारात तळोदा-अक्कलकुवा बायपास रस्त्यावर जोरदार धडक दिली. या घटनेत रस्ता दाखविणाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शनिवारी (ता. १२) रात्री साडेदहाला ही घटना घडली. त्यामुळे हकनाक एकास आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेऊन होंडा सिटीत पसार होणारा तो कोण याचा पोलिस शोध घेत आहेत. (Nandurbar Accident News Honda City collided on Taloda Akkalkuwa road one death )

तळोदा ते अक्कलकुवा बायपास रस्त्यावर गायत्री फिल्टर प्लांटच्या पुढे काळ्या रंगाचा होंडा सिटी गाडी (एमएच १२, केटी ४९९१)ने शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दीपकगिरी हिंमतगिरी गोसाई (वय ४४, रा. जामनगर, लालपूर रोड) यास जोरदार धडक देऊन दुखापत केली. त्यात दीपकगिरी गोसाई यांचा मृत्यू झाला.

दीपक गिरी गुजरातमधून जळगाव येथे जात होते. मात्र गायत्री फिल्टर प्लांट येथे त्यांचे वाहन रस्ता चुकले. त्यात वाहन रस्त्यावर घेऊन जाण्यासाठी ते रस्ता दाखवत होते. त्यात त्यांना काळ्या रंगाच्या होंडा सिटी धडक दिली व त्यात त्यांचा मृत्यू झाला.

रात्रीच्या अंधारात धडक देऊन पळ काढणारा तो नेमका कोण याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, काळ्या रंगाची होंडा सिटी गाडी पोलिसांनी घटनास्थळावरून पोलिस ठाण्यात आणली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र वाहनात असलेले मिळून आले नाहीत. त्यामुळे देवेंद्र नेनुजी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागूल तपास करीत आहेत.

दरम्यान, काळ्या रंगाच्या होंडा सिटी गाडीच्या वाहनचालक नेमका कोण याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे त्या अज्ञाताला शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांना मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate case: माणिकराव कोकाटेंना अद्याप अटक नाही, मध्यरात्री काय घडलं? डॉक्टरांनी काय सांगितलं?

Pune News : पेशवे सृष्टीचे काम रखडले; पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

CM Devendra Fadnavis: फलटणला सर्वात आधुनिक शहर बनवू: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; टीकाटिप्पणीपेक्षा विकास हा माझा अजेंडा!

Prakash Shinde: ड्रग्ज प्रकरणातून शिंदे कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न: प्रकाश शिंदे; अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार!

ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये गोड ट्विस्ट! 5 मिनिटांत घरच्या घरी बनवा विना अंड्याची Brownie, लगेच ट्राय करा

SCROLL FOR NEXT