Agricultural Exhibition (file photo)
Agricultural Exhibition (file photo) esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Agricultural Exhibition : शहादा येथे उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : येथील प्रेस मारुती मैदानावर २३ फेब्रुवारीपासून (शुक्रवारी) चारदिवसीय ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनास सुरवात होत आहे. भाजीपाला पिकात एकरी लाखाहून अधिक उत्पन्न देणारी करार शेती, मोफत पाणी परीक्षण हे या कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असेल.

२३ ते २६ फेब्रुवारीदरम्यानचे हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मोफत असून, प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी केले. ॲग्रोवर्ल्ड सिरीजमधील २१ वे, तर शहादा येथील दुसरे कृषी प्रदर्शन आहे. (Agroworld agricultural exhibition at Shahada)

सुशिक्षित तरुणांसाठी व्यवसायाची संधी

सुशिक्षित तरुणांसाठी विविध कंपन्यांची तालुकानिहाय डीलरशिपच्या माध्यमातून व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. क्षारयुक्त पाण्यामुळे जमिनीचा पोत खराब झाला आहे. अशा स्थितीत क्षारमुक्त वॉटर कंडिशनरच्या वापरामुळे जमिनीचा पोतही सुधारेल व उत्पादकता वाढण्यासही मदत होईल.

अशा विविध तंत्रज्ञानासह मजुरीला पर्यायी यंत्र व अवजारेही असतील. कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या विविध पिकांमधील वाणांबाबत सखोल मार्गदर्शन, केळी, पपई, उसासारख्या विविध फळे व भाजीपाल्याच्या नर्सरी, किचन गार्डन टूल्स, काटेकोर पाणी व्यवस्थापन तसेच बदलत्या हवामानानुसार पीक लागवड व तंत्रज्ञानाची माहितीदेखील या प्रदर्शनात मिळेल.

कृषी विभागाच्या विविध शासकीय योजना, बँक, कृषिविषयक पुस्तकेही एकाच छताखाली उपलब्ध होतील. एवढेच नव्हे तर खवय्यांसाठी खास खाऊगल्ली तसेच शॉपिंग महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे.

अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजित या कृषी प्रदर्शनासाठी जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड प्रायोजक आहेत. प्लॅन्टो कृषीत्र, ओम गायत्री नर्सरी, निर्मल सीड्स, नमो बायोप्लांट्स व आनंद ॲग्रो केअर सहप्रयोजक आहेत.

मोफत पाणी तपासणी व बियाणे

निर्मल सीड्स व ओम गायत्री नर्सरीतर्फे पहिल्याच दिवशी प्रदर्शनास येणाऱ्या पहिल्या पाच हजार शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणे सॅम्पल पाकीट मोफत देण्यात येणार आहे.

ओम गायत्री नर्सरी व आनंद ॲग्रो केअर यांच्यामार्फत पाण्याची (ईसी, पीएच, टीडीएस) मोफत तपासणी करून अवघ्या काही मिनिटांमध्ये जागेवरच रिपोर्ट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेव्हा प्रदर्शनास येताना तपासणीसाठी शेतकऱ्यांनी सोबत पाणी आणावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

Arvind Kejriwal: जेल की बेल! केजरीवालांचा तरुंगाबाहेर शेवटचा दिवस, आजची सुनावनी ठरवणार 'आप'चे भविष्य

Indian Typing Man : भारताचा टायपिंग मॅन! तिसऱ्यांदा गिनीज बुकमध्ये नोंद करत स्वतःचा रेकॉर्ड मोडला, पाहा व्हिडिओ

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT