Crime
Crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : जिल्हा पोलिसांच्या कारवाईत 3 कोटींचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : लोकसभा निवडणुकीच्या काळात नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने आजपावेतो तीन कोटी आठ लाखांहून अधिकचा मुद्देमाल विविध कारवायांत जप्त केला आहे. त्यात ९४ लाख ११ हजार ८५५ रुपयांची अवैध दारू, तीन लाख ५७ हजार ७१८ रुपये किमतीचा गांजा. (3 Crore worth of goods seized in action of District Police)

तसेच प्रतिबंधित असलेला ७० लाख ३० हजार ९०३ रुपये किमतीचा गुटखा व त्यासाठी वापरण्यात येणारी वाहने असा तीन कोटींपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्ह्यातील आजपावेतो चार हजार ९५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. विविध गंभीर गुन्ह्यांतील एकूण २४ सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील विविध गुन्ह्यांतील पाहिजे/फरारी आरोपी असलेल्या ३२ आरोपींना अटक करण्यात यश मिळाले. आजपावेतो जिल्ह्यातील ४८४ परवानाधारकांकडील शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. संपूर्ण जिल्ह्यात २६ आंतरराज्य आणि आठ आंतरजिल्हा तपासणी नाके/नाकाबंदी पॉइंट कार्यरत असून, या नाक्यांवरून अवैध दारू.

अमली पदार्थ, बेहिशेबी रोकड इत्यादी अशा अवैध बाबींची वाहतूक होणार नाही यासाठी सतर्कपणे तपासणी सुरू आहे. अवैध धंद्यावर छापेमारी, कोम्बिंग ऑपरेशन, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर नजर ठेवली जात असून, उशिरापर्यंत हॉटेल्स, ढाबे, बार इत्यादी आस्थापना सुरू राहणार नाहीत याची दक्षता घेतली जात आहे.

बीट मार्शल, गस्तीपथके, भरारी पथके संपूर्ण जिल्ह्यात वेळोवेळी आपले कर्तव्य चोखपणे बजावीत आहेत. निवडणूक प्रचारासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त, प्रचारादरम्यान रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये इत्यादी सर्व बाबींवर विशेष लक्ष दिले जात आहे.

सोशल मीडियावर ‘वॉच’

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर सायबर सेल वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेळोवेळी सतर्क असून, समाजविघातक पोस्ट व्हायरल/शेअर करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवून आहे. लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा पोलिस विभाग कटिबद्ध असून, संपूर्ण विभाग सुसज्ज आहे.

"लोकसभा निवडणूक काळात कुठल्याही आमिष व भीतीला बळी न पडता, आपले मतदान करावे व लोकशाही कर्तव्य बजावावे. नागरिकांना काही अडचण असल्यास किंवा काही असामाजिक तत्त्वांबद्दल व अवैध गतिविधींबद्दल माहिती असल्यास पोलिस विभागास संपर्क साधावा." -श्रवण दत्त एस., जिल्हा पोलिस अधीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eid ul Adha 2024: बकरी ईद निमित्त कुर्बानी द्यायच्या पशूंचे तपासणी शुल्क दोनशे वरून वीस वर; राज्य सरकारचा निर्णय

IND W vs SA W: भारतीय संघाचा पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेला धोबीपछाड; आशा शोभनानं 4 विकेट्स घेत गाजवलं पदार्पण

Sheena Bora Murder Case : हाडे सापडलीच नव्हती... इंद्राणीचा सांगाडा अन् राहुल मुखर्जीबाबत मोठा दावा, जाणून घ्या काय म्हणाली?

T20 World Cup चालू असतानाच शुभमन गिल अन् आवेश खान का परतले भारतात? अखेर टीम इंडियाच्या कोचनेच केला खुलासा

आम्ही लग्नाळू! मॅट्रिमोनी साईटवरही नाही मिळाली मुलगी, युवक थेट न्यायालयात; वेबसाईटला दिले भरपाई देण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT