A box of beer seized by the police. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : राणीपूर येथे अवैध बियरचा साठा जप्त; म्हसावद पोलिसांची कारवाई

Nandurbar Crime : राणीपूर (ता. शहादा) येथे पोलिसांच्या पथकाने सातपुड्यात वाहून नेण्यात येणारी ३ लाख ६० हजार रुपयांची बियर व पिकअप वाहन म्हसावद पोलिसांनी जप्त केले.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : राणीपूर (ता. शहादा) येथे पोलिसांच्या पथकाने सातपुड्यात वाहून नेण्यात येणारी ३ लाख ६० हजार रुपयांची बियर व पिकअप वाहन म्हसावद पोलिसांनी जप्त केले. बुधवारी (ता. ८) पहाटे राणीपूर परिसरातील धावडी पॉइंटवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकास अटक करण्यात आली असून, दुसरा फरार झाला आहे. कारवाईत एकूण १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Nandurbar Crime Illegal beer stock seized in Ranipur )

म्हसावद-तोरणमाळ रस्त्यावरून महिंद्रा पिकअप वाहनातून (क्र. एमएच-३९-एडी-१५२७) अवैध दारूची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती म्हसावद पोलिस ठाण्याच्या पथकाला मिळाली होती. यातून पथकाने बुधवारी (ता. ८) पहाटे साडेतीनच्या सुमारास याठिकाणी सापळा रचला होता. दरम्यान, धावडी पोरस पॉइंटजवळ चोरटी वाहतूक करणारे वाहन राणीपूर गावाकडे जात असताना दिसून आले.

पोलिस पथकाने हे वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन पुढे पळवले होते. पोलिस पथकाने वाहनाचा पाठलाग करून काही अंतरावर त्याला ताब्यात घेतले. या वाहनाची तपासणी करण्यात आली असता, त्यातून ३ लाख ६० हजार रुपये किमतीची बियर मिळून आली. ३ लाख ६० हजार रुपयांची बियर आणि ७ लाख रुपयांचे वाहन असा एकूण १० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.

याप्रकरणी पोलिसांनी चालक सुरेश गुलाबसिंग भील (वय २७, रा. नागझिरी, ता. शहादा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई म्हसावदचे प्रभारी पोलिस अधिकारी राजन मोरे, पोलिस कर्मचारी बहादूर भिलाला, दादाभाई साबळे, शैलेशसिंग राजपूत, मोहन सावळे, अजित गावित, उमेश पावरा, राकेश पावरा यांचा पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT