Fake note of five hundred rupees. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Fake Notes Case: धडगाव परिसरात बनावट नोटांचा सुळसुळाट! सर्वसामान्यांची फसवणूक; लोकसभा निवडणुकीनंतर डोकेदुखी वाढली

Fraud Crime News : असाच प्रकार कायम घडत असल्याचे संबंधितांनी सांगितले. यावरून शहर व तालुक्यात बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

सागर निकवाडे : सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Fake Notes Case : महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या तिन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात असलेल्या धडगाव शहरातील बाजारपेठेत ५०० रुपयांच्‍या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात आल्‍याने व्‍यापारी आणि ग्राहकांच्‍या अडचणीत वाढ झाली आहे. गेल्‍या काही दिवसांत अनेक ठिकाणी पाचशेच्‍या बनावट नोटा चलनात आल्‍याचे निदर्शनास आले आहे. या रॅकेटचा तपास करून कारवाईची मागणी केली जात आहे. (Nandurbar crime Scattering of fake notes in Dhadgaon area)

धडगाव शहरातील विहान पेट्रोलियम या पेट्रोलपंपावर ५०० रुपयांची बनावट नोट आढळली. त्या नोटांची पुन्हा पडताळणी केली. मात्र, त्यातून त्या बनावटच असल्याचे आढळले. असाच प्रकार कायम घडत असल्याचे संबंधितांनी सांगितले. यावरून शहर व तालुक्यात बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे.

कोणाकडून तरी आलेली बनावट नोट सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. त्यातच बँकेत भरणा करताना बँकेच्या अधिकाऱ्यांकडून आर्थिक तोटाही सहन करावा लागत आहे. बनावट नोटांची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई आवश्यक असताना पोलिस यंत्रणेचेच याकडे दुर्लक्ष आहे.

शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून बनावट नोटा आढळण्याचे प्रमाण वाढले आहे; परंतु आर्थिक नुकसान व चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी फसगत झालेले नागरिक तक्रार करण्यास धजावत नाहीत. यातच फसवणूक करणाऱ्यांचे फावते आहे.

या बनावट नोटा वापरणारी टोळी धडगाव आणि मोलगी या आदिवासीबहुल परिसरात फिरत आहेत. सुटे पैसे मागण्याचा बनाव करून खोटी नोट देऊन व्यापाऱ्यांना फसविले जाते. शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे अपटूडेट पोशाख असलेले हे लोक बाजारात बनावट नोटा चालवत आहेत. (latest marathi news)

बनावट नोट मिळाल्‍यास काय करावे?

एखाद्या व्‍यवहारातून आपल्‍याकडे एखादी संशयास्‍पद नोट आली तर सर्वप्रथम बँकेत जाऊन मशिनद्वारे त्‍याची सत्‍यता पडताळून पाहावी. नोट बनावट निघाल्‍यास स्‍थानिक पोलिस ठाण्‍यात जाऊन या संदर्भात तक्रार करावी. रिझर्व बँकेच्‍या नियमानुसार, बँकेच्‍या निदर्शनास संबंधित नोट आणून दिल्‍यास, त्‍या बदल्‍यात त्‍याच मूल्‍याचे पैसे दिले जात नाहीत. बनावट नोट व्‍यवहारात आणणे किंवा ती फिरवणे हा गुन्‍हा आहे.

"गेल्या दोन-तीन दिवसांपासून नागरिक पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोलपंपावर येत आहेत. त्यांच्याकडून घेतलेल्या पाचशे रुपयांच्या नोटा या मशिनमध्ये चेक केल्यानंतर बनावट आढळल्या आहेत."-जितेंद्र पावरा, पेट्रोलपंप कर्मचारी

"आमच्या शाखेत मशिनमधून प्रत्येक नोट चेक होते. अशात बनावट नोट आढलेल्या नाहीत. बनावट नोट आढळल्यास ग्राहकाला त्याचा पुरावा द्यावा लागतो अन्यथा त्याच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल केला जातो."-शाखाधिकारी, एसबीआय, धडगाव

"बनावट नकली नोटांची तक्रार अद्यापही आमच्यापर्यंत आलेली नाही. आमच्यापर्यंत तक्रार आल्यास तातडीने त्याचा तपास करून कारवाई करणार."

-आय. एन. पठाण, पोलिस निरीक्षक, धडगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Puran Kumar: देश हादरला! IPS ऑफिसरने डोक्यात गोळी झाडून संपवलं आयुष्य, सुसाइड नोटमधून धक्कादायक खुलासा; IAS पत्नी मुख्यमंत्र्यांसोबत दौऱ्यावर..

Kolhapur Zilla Parishad : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे गणित बदलणार, सर्वोच्च न्यायालयाने चक्राकार पद्धतीसाठीची याचिका फेटाळली

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई विमानतळावर दाखल

Shiv Sena Party Symbol Hearing : निवडणुका तोंडावर आणि पुन्हा मिळाली पुढची तारीख, शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीवेळी नेमकं काय घडलं ?

3 Ingredient Kaju Katli for Diwali: यंदाची दिवाळी साजरी करा हेल्दी पद्धतीने; घरीच बनवा फक्त ३ पदार्थांपासून काजू कतली

SCROLL FOR NEXT