Suspect's car seized by Sangvi police. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : पंजाबमधील गुन्हेगारांना हाडाखेडजवळ अटक

Nandurbar : पंजाब राज्यात दरोडा टाकून पळ काढणाऱ्‍या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीतील तिघांना सांगवी पोलिसांनी शिताफीने अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : पंजाब राज्यात दरोडा टाकून पळ काढणाऱ्‍या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीतील तिघांना सांगवी पोलिसांनी शिताफीने अटक केली. गुरुवारी (ता.२७) हाडाखेड (ता. शिरपूर) येथील सीमा तपासणी नाक्यावर ही कारवाई झाली. संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पंजाब पोलिस शिरपूरकडे निघाले आहेत. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना संशयित गुन्हेगार कारमधून मध्य प्रदेशातून महाराष्ट्राकडे येत असल्याची माहिती मिळाली होती. (Criminals from Punjab arrested near Hadakhed)

त्यांनी सांगवी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना कारवाईचे आदेश दिले. हिरे यांनी सहकाऱ्‍यांसह हाडाखेड नाक्यावर सापळा रचला. कार (पीबी ०२, डीजी ०२६४) येताना पाहून पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी झडप घालून संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांमध्ये संदीपसिंग मुख्य्त्यारसिंग (वय २८, रा. अमृतसर, पंजाब), दीपककुमार भीमराव कुरडीया (वय ३०, रा. खंडवाला, अमृतसर पंजाब) व गुरप्रीतसिंग कश्मीरसिंग (वय ३४, रा.अमृतसर, ह.मु. छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे.

त्यांच्या झडतीत ३८ हजार रुपये रोख व पाच मोबाईल आढळले. संशयितांना सांगवी पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता संशयित गुरप्रीतसिंग याने साथीदारांच्या मदतीने अमृतसर येथे दरोडा टाकून ९५ लाख रुपये रोख, ३२ बोअरचे रिव्हॉल्व्हर व दोन वाहने चोरी केल्याची कबुली दिली. सांगवी पोलिसांनी अमृतसर पोलिसांशी संपर्क साधून संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, उप विभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, सहायक उपनिरीक्षक कैलास पाटील,सहायक उपनिरीक्षक रफिक मुल्ला, हवालदार शेख, राजू ढिसले, धनगर, खसावद, ठाकरे, पाटील, मोरे आदींनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kunbi Certificate Cancellation: कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यामागे सरकारचा मोठा कट, बदला घेतल्याशिवाय राहणार नाही; मनोज जरांगे यांचा थेट इशारा

Marathi News Live Updates : एकनाथ शिंदे यांच्यावरील गद्दारीचा डाग आम्ही मराठ्यांनी पुसला, आता हीच उपकाराची परतफेड का? मनोज जरांगे यांचा थेट सवाल

Uttarakhand Travel: Uttarakhand 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' ट्रेकिंगसाठी खुली; ब्रिटिश पर्वतारोहकांनी कसा लावला होता 'हिमालयीन नंदनवनाचा' शोध?

Meerut Viral Video: मेरठमध्ये कांवडियांनी पोलिसांना मारहाण केली? व्हायरल व्हिडिओमागचं खरं सत्य समोर

काळीज चिरणारा Video: मॅच सुरू असताना वीज कोसळली अन् २४ वर्षीय खेळाडूचा जागीच मृत्यू...

SCROLL FOR NEXT