Shiv Sena leader Chandrakant Raghuvanshi felicitating Mahayuti candidate Dr. Heena Gavit during her visit. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : डॉ. हिना गावित यांनी घेतली चंद्रकांत रघुवंशी यांची भेट!

Nandurbar News : महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांनी प्रचाराचा शुभारंभ करून झाल्यावर रॅलीने जात असतानाच शिंदे गटाचे शिवसेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेत आशीर्वाद घेतले.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांनी प्रचाराचा शुभारंभ करून झाल्यावर रॅलीने जात असतानाच शिंदे गटाचे शिवसेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. नंदुरबारच्या राजकीय पार्श्‍वभूमीवर ही घटना शहरवासीयांना धक्का देणारी ठरली. त्यामुळेच रघुवंशी व गावित यांची भेट चर्चेची सुद्धा बनली. (Dr. Heena Gavit met Chandrakant Raghuvanshi)

शहरातील गणेश मंदिरात श्री गणेशचरणी नारळ वाढवून नंदुरबार शहरात प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांनी सकाळी अकराच्या सुमारास शिंदे गटाच्या शिवसेना कार्यालयात जाऊन शिवसेनेचे संपर्कनेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेतली. (Latest Marathi News)

श्री. रघुवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. गावित यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, डॉ. विक्रांत मोरे, आनंदा माळी, माजी गटनेते चारुदत्त कळवणकर, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी उपनगराध्यक्ष परवेज खान, रवींद्र पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Insurance Sector: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! १००% FDI ला मंजुरी; इंश्योरन्स क्षेत्रात मोठा धमाका, पण LIC साठी नियम वेगळे

रितेश देशमुखने घेतलं पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं दर्शन, म्हणाला...'माझे वडिल विलासराव देशमुख यांना...' Viral Video

nasrapur case updates: 'माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत.. पीडित मुलीच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया...

Pune ATS Arrest: येरवडा जेलमधून पळाल्यानंतर ६ वर्षे फरार राहिलेला मोक्का आरोपी अजिंक्य कांबळे एटीएसच्या सापळ्यात

Latest Marathi News Live Update : नीलम गोऱ्हे यांची सोशल मीडियावरील गैरवापराबाबत तीव्र प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT