mulching paper use in the field.
mulching paper use in the field. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Agriculture News : बोरद परिसरातील शेतकऱ्यांची आधुनिक शेतीकडे वाटचाल; बियाण्याऐवजी रोपलागवडीकडे वाढता कल

सकाळ वृत्तसेवा

बोरद : परिसरात शेतकरी सध्या आधुनिक शेतीकडे वळाल्याचे चित्र दिसत आहे. येथील शेतकरी शेतामध्ये विविध प्रयोग राबविताना नजरेस पडत आहे. परिसरात शेतजमीन मोठ्या प्रमाणावर असल्याने व परिसरात पिकांच्या गरजेप्रमाणे पाणी उपलब्ध असल्याने ते टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी शेतामध्ये विविध प्रयोग राबविताना सध्या नजरेस पडत आहेत. (Farmers in Borad area are moving towards modern agriculture)

पारंपरिक शेतीला बगल देत येथील शेतकरी वैज्ञानिक दृष्टिकोनातून तसेच संशोधनातून साकारल्या जाणाऱ्या आधुनिक शेतीकडे वळाल्याचे चित्र आहे. आधी शेतामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी संपूर्ण शेत ओले करावे लागत होते; परंतु आता शेतकरी फक्त पिकांना पाणी कसे देता येईल याकडे आपले लक्ष वळवीत आहे.

जमिनीचा ओलावा टिकण्यास मदत

शेतकरी आपल्या शेतात पिकांची लागवड करण्यापूर्वी तणाचादेखील विचार करताना दिसून येत आहे. त्याचबरोबर जमिनीत पाण्याचा ओलावा टिकून राहावा व वातावरणाचा कुठलाही परिणाम पिकावर होऊ नये या दृष्टिकोनातून आपल्या शेतामध्ये मल्चिंग पेपरचा वापर करताना दिसत आहे. बोरद परिसरात विविध रस्त्याने प्रवास करत असताना शेतशिवारात पाहिले असता मल्चिंग पेपरच्या माध्यमातून शेती होत असल्याचे आपल्याला सहज दिसून येते.

तापमान व आर्द्रता नियंत्रित

मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन वापरल्यामुळे शेतकऱ्यांना कमी पाण्यामध्ये चांगले उत्पन्न मिळत आहे. त्याचबरोबर पिकांच्या सोबतीने वाढणाऱ्या तणावरदेखील नियंत्रण राखता येत आहे. त्यामुळे तण काढणीवर होणारा शेतकऱ्यांचा खर्च यामुळे वाचत आहे. पेपरच्या आच्छादनामुळे तापमान आणि आर्द्रता नियंत्रित होत असल्याने पीकवाढीला फायदा होत आहे.

त्याचबरोबर किडीचा प्रादुर्भाव होण्यापासून पिकाला वाचविता येत आहे. अतिरिक्त पाऊस झाला तरी त्याचा फारसा परिणाम उत्पादनावर होत नसल्यामुळे मल्चिंगचा वापर अधिक प्रमाणात परिसरातील शेतकरी करू लागले आहेत. (Latest Marathi News)

हेक्टरी ३२ हजार खर्च

मल्चिंग पेपर आच्छादनासाठी साधारणता ३० ते ३२ हजार रुपये हेक्टरी खर्च येतो. यासाठी शासनाची अनुदान योजनादेखील उपलब्ध आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना १६ हजार रुपयांपर्यंत हेक्टरी अनुदान मिळते. या योजनेला प्राप्त करून घेण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क करावा लागतो. त्यामुळे या योजनेत अनेक शेतकरी सहभागीदेखील आहेत.

पिकाची निगा राखणे सोपे

मल्चिंग पेपरबरोबरच शेतकरी तयार रोपांवर अधिक भर देत आहेत. आधी बियाणे जमिनीत रोवून त्या बियाण्याच्या माध्यमातून पिकांची उगवण केली जात होती; परंतु आता शेतकरी तयार रोपांची लागवड करत असल्याने पिकांचा कालावधी काहीअंशी कमी होत आहे. रोपांच्या लागवडीतून पिकाची निगा राखणे शेतकऱ्यांना सोपे जात आहे.

रोपलागवडीतून मररोगावर नियंत्रण राखता येत आहे. त्याचबरोबर योग्य खते, तसेच विविध कीटकनाशके तसेच पोषक द्रवाचा वापर करून अधिक उत्पन्न मिळविता येते आहे. एकंदरीत परिसरातील शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत आहे आणि ते शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

OYO IPO: लवकरच येणार ओयोचा आयपीओ; सेबीकडे पुन्हा कागदपत्र जमा करण्याच्या तयारीत

Virat Kohli on Chris Gayle : RCBमध्ये पुन्हा एकदा एंट्री करणार युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल? विराट कोहलीने दिली ऑफर

Healthy Diet For Kids : मुलांच्या निरोगी वाढीसाठी आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश, मिळतील भरपूर फायदे

SCROLL FOR NEXT