Fraud Crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Fraud Crime : दामदुप्पट योजनेचे आमिष दाखवून अनेकांना पावणेचार कोटींचा गंडा

Nandurbar Fraud Crime : कसबा (बारामती) येथील कंपनीच्या नावाने दामदुप्पट योजना सुरू करून व कंपनीचे एजंट बनून अनेक नागरिकांना कंपनी दामदुप्पट रक्कम देत असल्याचे आमिष दाखवून लाखोंची रोकड जमा केली.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Fraud Crime : कसबा (बारामती) येथील कंपनीच्या नावाने दामदुप्पट योजना सुरू करून व कंपनीचे एजंट बनून अनेक नागरिकांना कंपनी दामदुप्पट रक्कम देत असल्याचे आमिष दाखवून लाखोंची रोकड जमा केली. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील २० पेक्षा जास्त जणांची फसवणूक करून तीन कोटी ८८ लाखांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. (Nandurbar Fraud crime By becoming an agent of company collected lakhs of cash)

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी नंदुरबार शहर पोलिस ठाणे गाठत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापूर्वीही अनेक चीट फंड कंपन्यांनी नागरिकांना गंडा घातला आहे. कसबा येथील फ्लॅट क्रमांक ५, धवन पाटील हाइट्स असा पत्ता असलेल्या एसपीव्हीएस ग्रुप ऑफ कंपनीजच्या नावाने एजंट बनून मदन जहागीर पाडवी (रा. जमाना, ता. अक्कलकुवा).

कंपनीचे संचालक विकास दादा निकम (रा. खांडस सांगवी, ता. बारामती, जि. पुणे), सचिन डोंगरे (मु. पो., कलकी, ता. फलटण, जि. सातारा), प्रवीण दादा निकम (खांडस सांगवी, ता. बारामती), एजंट छगन जहाँगीर पाडवी, रा. जमाना, ता. अक्कलकुवा), देवानंद खटावकर (नांदेड), अक्षय भाऊसाहेब गोमासे (कर्ज देणाऱ्या बॅंकेचा एजंट, रा. वासननगर, पाथर्डी फाटा, नाशिक).

सय्यद अब्बास रेन (फायनान्शियल सर्व्हिस, रा. वाशी, मुंबई) यांनी संगनमत करून नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांशी संपर्क साधत ‘तुम्ही आमच्या एसपीव्हीएस ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास दामदुप्पट परतावा रक्कम मिळेल,’ असे आमिष दाखवून पैसे लुटले. त्याला बळी पडून शशिकांत शिवाजी पराडके (रा. दुधाळे शिवार, नंदुरबार) यांनी ८६ लाख, उज्ज्वला शिवाजी पराडके (रा. जुने धडगाव) यांनी ६८ लाख ५० हजार. (latest marathi news)

बानाजी रुस्तम पुठ्ठेवाड (रा. मंगलदास पार्क, नवापूर) यांनी ६७ लाख, उमेश शेषराव राठोड (रा. अश्‍विनी पार्क, दुधाळे, नंदुरबार) यांनी ६२ लाख ८७ हजार, अर्चना रामजी पाडवी (रा. गिरीकुंज सोसायटी, नंदुरबार) यांनी २५ लाख रुपये असे एकूण तीन कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये व त्यांच्या ओळखीच्या इतर सुमारे २० जणांकडूनही अशा प्रकारे रक्कम गुंतवून करून घेतली.

ही रक्कम नोव्हेंबर २०२१ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत जमा केली. या रकमेचा दामदुप्पटचा कालावधी पूर्ण झाल्याने संबंधितांकडे गुंतवणूकदार मागणी करू लागले. मात्र, संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरे देणे, फोन न उचलणे, संपर्काच्या बाहेर जाणे असे प्रकार घडू लागल्याने, गुंतवणूकदार नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले.

त्यांनी तत्काळ नंदुरबार शहर पोलिस ठाणे गाठून नारसिंग फुलसिंग पाडवी (रा. जमाना, ता. अक्कलकुवा) यांनी फिर्याद दिली. त्यावरून संबंधितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात अजूनही नागरिकांची फसवणूक झाल्याचा संशय आहे. ते प्रकरणही उघडकीस येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक वासुदेव देसले तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT