Dr. Heena Gavit, Gowaal Padavi  Esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha Constituency : नंदुरबार मतदारसंघात रंगणार डॉक्टर-वकील विरुद्ध वकील लढत

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात डॉक्टर विरूध्द लढत वकील लढत रंगणार, संसदेत जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी डॉक्टरांची नव्हे; तर वकिलाची गरज आहे, अशी वकील उमेदवार असलेल्या गटातून चर्चा जोर धरू लागली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात डॉक्टर विरूध्द लढत वकील लढत रंगणार, संसदेत जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी डॉक्टरांची नव्हे; तर वकिलाची गरज आहे, अशी वकील उमेदवार असलेल्या गटातून चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र प्रत्यक्षात भाजप व कॉंग्रेसच्या उमेदवारांमध्ये डॉक्टर विरुद्ध वकील अशी लढत नव्हे; तर डॉक्टर- वकील विरुद्ध वकील अशी लढत रंगणार आहे. (Nandurbar Lok Sabha Constituency)

कारण हिना गावित ह्या केवळ डॉक्टर नसून त्यांनी कायद्याचेही शिक्षण घेतले आहे. नंदुरबार लोकसभा निवडणुकीचा रिंगणात असलेल्या भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांनी वैद्यकिय शिक्षण पूर्ण केले आहे. ते जनतेला आरोग्य सेवा देण्याचा तयारीत असतांनाच त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात आरोग्याची विविध शिबिरे भरवून आरोग्य सुविधांचा लाभ जनतेला दिल्या.

वैद्यकीय सेवा करीत असतांनाच अचानक त्यांना भाजपच्या माध्यमातून २०१४ ला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करीत त्यांनी निवडणूक लढविली अन् जिंकलीही. त्यामुळे ज्येष्ठ असले तरी तत्कालिन कॉंग्रेसचे उमेदवार माणिकराव गावित हे डॉ. हिना गावित यांच्यासमोर अल्पशिक्षित ठरले.

मात्र उच्चशिक्षित डॉक्टर उमेदवाराने मतदारसंघात सलग दोन पंचवार्षिक आपले वर्चस्व राखले. आता त्यांच्यासमोर कॉंग्रेसने पुन्हा उच्चशिक्षित व तरूण उमेदवार ॲड. गोवाल पाडवीच्या रूपाने दिला आहे. त्यामुळे दोन्हीही आमने- सामने लढणारे उमेदवार हे आता उच्चशिक्षित आहेत. मात्र कॉंग्रेसच्या गटाकडून व सर्वसाधारण नागरिकांमध्ये आता डॉक्टर विरूध्द वकील अशी लढत चांगलीच रंगणार असे बोलले जात आहे. (Latest Marathi News)

तसेच संसदेत डॉक्टरांची नव्हे; तर जनतेचे प्रश्‍न मांडण्यासाठी, कायद्याने लढा देण्यासाठी वकिलाची गरज आहे असेही बोलले जात आहे. मात्र ही लढत खऱ्या अर्थाने डॉक्टर विरुद्ध वकील नव्हे; तर डॉक्टर - वकील विरुद्ध वकील अशी रंगणार आहे. कारण भाजपच्या उमेदवार हिना गावित यांना संसदेत नंदुरबार लोकसभेतील आरोग्याचे प्रश्‍न मांडण्यासाठी वैद्यकीय शिक्षण कामी येत आहे.

त्यानंतर त्या जाणून होत्या की, पुढे जनतेचे प्रश्‍न संसदेत कायद्याने सोडविण्यासाठी कायद्याचे शिक्षण घेणे आवश्‍यक आहे. म्हणून त्यांनी कायद्याचे शिक्षणही पूर्ण केले आहे. ॲड. गावित ह्या संगीत विशारद असून भरतनाट्यममध्येही निपूण आहेत.त्या वकील असल्याचे अद्याप अनेकांना माहित नाही. त्यामुळे मतदारसंघात डॉक्टर व वकील विरुद्ध वकील अशी लढत रंगणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : नागपुरात कळमेश्वर MIDC मध्ये एशियन केमिकल्सवर कृषी विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT