Vijaykumar Gavit esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : नंदुरबारची समस्या सोडविण्यासाठी तापी नदीचे पाणी आणणार : मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Nandurbar News : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणामध्ये या वर्षी अद्याप पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे चिंताजनक स्थिती आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणामध्ये या वर्षी अद्याप पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे चिंताजनक स्थिती आहे. शहरातील नागरिकांना चार दिवसांआड पाणी मिळत आहे. त्यासाठी तापी नदीतून वीरचक धरणामध्ये पाणीपुरवठा करून लवकरच शहराला शुद्ध पाणी देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव तयार केला आहे. (Minister Dr Vijaykumar Gavit statement Tapi river water will be brought to solve problem of Nandurbar)

तो लवकरच मंजूर होईल. त्यामुळे शहराचा पाणीप्रश्‍न सुटणार आहे, अशी माहिती आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, की मी ३० वर्षांपासून राजकारणात आहे. नंदुरबार जिल्ह्याचा विकास करण्यासाठी डॉ. हीना गावित, नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित सातत्याने विविध योजना राबवून जिल्ह्यात काम करीत आहेत.

आदिवासी विकास विभागामार्फत महाराष्ट्रातदेखील या योजना राबवत असतो, त्यातून सामान्य नागरिकांच्या विकास होत आहे. सामान्य नागरिकांना एकाही पैशाची झळ बसणार नाही, याची आम्ही काळजी घेतली आहे. तापी नदीचे पाणी वीरचक धरणामध्ये आणण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

त्याचा कोणताही बोजा शहरातील नागरिकांवर येणार नाही. कोणतीही पाणीपट्टी वाढणार नाही. नंदुरबार शहरासाठी दोन उड्डाणपूल तयार केले, त्यावेळेसदेखील आम्ही निधी उपलब्ध करून दिला. तसेच शहरवासीयांना पेट्रोलमध्ये करामुळे एक रुपया जास्त लागत होता, ती संपूर्ण रक्कम आदिवासी विभागाच्या निधीतून भरून तो कर बंद केला. (latest marathi news)

तसेच नाट्यमंदिरासाठीदेखील निधी उपलब्ध करून दिला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी आदिवासी विकास विभागाकडून मोठ्या प्रमाणावर रस्ते तयार करून दिले. आतापर्यंत विरोधकांनी शासनाकडून आलेली योजना सामान्य जनतेपर्यंत पोचविली नाही, उलट आम्ही करत असलेल्या विकासकामांना कसे थांबवायचे यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात.

‘लाडकी बहीण’ महत्त्वाकांक्षी योजना

डॉ. गावित म्हणाले, की महायुती सरकारने लागू केलेली लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्याचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी मुख्यमंत्री देणार आहेत. त्यासाठी ३१ जुलैपर्यंत भगिनींनी फॉर्म पूर्ण भरून द्यावेत, ही योजना पुढेदेखील चालू राहणार आहे. महायुती सरकारने लागू केलेली लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून, चांगली अंमलबजावणी व्हावी म्हणून सरकार लक्ष देत आहे.

त्यासाठी ग्रामीण भागातील महिलांचे फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडीसेविका, आशा वर्कर यांच्याकडेदेखील फॉर्म भरून द्यावेत. तसेच शहरी भागातील वॉर्ड झोनल अधिकाऱ्याने फॉर्म भरून घ्यावेत. प्रत्येक गावातील प्रत्येक महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी गावागावांत अर्ज भरून घेतले जात आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यापुढेदेखील चालू राहणार आहे. योजनेच्या सर्व अटी शिथिल करण्यात आल्या असून, फक्त रहिवास दाखला, आधारकार्ड वगैरे चारच प्रकारचे कागद जोडणे आता आवश्यक केल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT