Accident Accident
उत्तर महाराष्ट्र

नंदूरबार: भजनी मंडळींची गाडी दरीत कोसळली; आठ जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

तोरणमाळ घाटातील सिंदीदिगर गावाजवळ खडकी घाटात प्रवासी वाहतुक करणारी खासगी क्रूजर मोटार दरीत कोसळुन 8 जणांचा जागीच मृत्यू झाला.

नंदुरबार- तोरणमाळ घाटातील सिंदीदिगर गावाजवळ खडकी घाटात प्रवासी वाहतुक करणारी खासगी क्रूजर मोटार दरीत कोसळुन 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, जवळपास १२ प्रवासी जखमी झाले आहेत. परिसरात पावसाची रिपरिप सुरू असल्याने आणि सायंकाळनंतर अंधारामुळे मदत कार्यात अडथळे येत होते. मृत व जखमी हे बडवानी (मध्य प्रदेश) जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते. भजन मंडळीचा कार्यक्रम करण्यासाठी 26 जण एका वाहनाने नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे येत होते.

रविवारी सायंकाळी सिंदीदिगर घाटातून क्रुझर मोटार सुमारे २6 प्रवाशांना घेऊन जात होती. अतिशय खडतर व अपघाती वळण असलेल्या या घाटात ब्रेक फेल झाल्याने गाडी दरीत कोसळली. ब्रेक फेल झाल्याचा अंदाज येताच चालकाने ओरडा केला. त्यामुळे काही जणांनी गाडीतून उड्या घेत स्वत:चा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात ते जखमी झाले. ज्यांना उडी मारणे शक्य झाले नाही, असे आठ जण गाडीसह दरीत कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ग्रामस्थांचा मदतीने मदत कार्य सुरू केले.

सहा महिन्यांत दुसरा अपघात

या भागात नुकताच पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून रस्ता बनला आहे. सहाच महिन्यांत या रस्त्यावरील हा दुसरा भीषण अपघात आहे. हा सगळा भाग मोबाईल कव्हरेज क्षेत्राबाहेर आणि खडतर असल्याने याठिकाणी मदतकार्य करण्यास अनेक अडथळे निर्माण होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drought: पावसाअभावी भातपिके वाळू लागली; मुळशी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक

Traditional Farming: ट्रॅक्टरच्या युगातही बैलजोडीचा ध्यास; २२ वर्षांच्या ‘राजा’नंतर खंडेराव बकाल यांनी पुन्हा जपला शेतीचा पारंपरिक वारसा

रस्त्याच्या दर्जावरून लोकांनी प्रश्न विचारले, व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला मंत्र्यांने कानशिलात लगावली; VIDEO VIRAL

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गुप्त बैठक; सुजय विखेंचा थोरातांना वाकून नमस्कार चर्चेत

रिपोर्टवर ‘नॉर्मल’ लिहिलंय म्हणून खुश होऊ नका! हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉलची आकडेवारी समजून घ्या!

SCROLL FOR NEXT